तिकीट वाटप गोंधळात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्तीला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चोपले  - In the confusion of ticket distribution, a Congress woman worker was beaten by the Congress workers | Politics Marathi News - Sarkarnama

तिकीट वाटप गोंधळात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्तीला कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी चोपले 

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

यूपीत विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तिकीट वाटपावरून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत.

लखनौ : एकीकडे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस प्रकरणात पीडित युवतीवरील अन्यायाविरोधात आवाज उठवित असतानाच त्यांच्या पक्षात कार्यकर्त्यांनी एका महिलेला बेदम मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. 

यूपीत विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत असून तिकीट वाटपावरून पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मतभेद आहेत. देवरिया जिल्ह्यात तिकीट वाटपावरून कॉंग्रेसमध्ये जी हाणामारी झाली आहे त्यावरून कॉंग्रेसवर टीका होऊ लागली आहे.

तिकीट वाटपाची चर्चा सुरू असताना एका महिलेने पक्षाचे राष्ट्रीय सचिनव सचिन नायक यांच्या अंगावर फुलाचा गुलदस्ता फेकण्याबरोबरच थोबाडातही लगावल्याने वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी महिलेला चांगलाच चोप दिला. 

हा गोंधळ सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी त्या महिलेबरोबर आलेल्या अन्य महिलांनाही कार्यकर्त्यांनी मारहाण केली. 

ज्या महिलेला मारहाण झाली त्या तारा देवी यांनी सांगितले की गेल्या चार वर्षापासून पक्षाची सदस्य आहे. ज्या मुकुंद भास्कर यांच्या बलात्काराचा आरोप आहे त्यांना तिकीट देऊ नका अशी माझी मागणी आहे. त्यांना तिकीट देऊन चूक केली आहे. ज्यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांनाच तिकिट द्या अशी मागणी करीत तारा या सचिन नायक यांच्या नजिक गेल्या असता गोंधळाल सुरवात झाली. 

ज्या तारा यांच्या नायक यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे तो चुकीचा आहे. मी सचिन यांना मारले नाही. मी त्यांच्याजवळ गेले आणि इतकेच विचारले की ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे त्यांना तिकीट का दिले ? हा प्रश्‍न करताच मला उपस्थित र्कांग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. 

दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी हाथरसमध्ये जावून पीडित महिलेसाठी आवाज उठविला. मात्र त्यांच्या पक्षात एका महिलेवर हात उचलला जातो. तिला बेदम मारहाण केली जात आहे हे दुर्दैव असल्याचे तारा यांनी म्हटले आहे. 

हे ही वाचा : हाथरस प्रकरणाचा तपास सीबीआयने घेतला हाती

लखनौ : हाथरस येथील अत्याचार प्रकरणावरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या प्रकरणामुळे उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यस्थेची ढासळलेली स्थिती सगळ्यांसमोर आली होती. या प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्य सरकारला लक्ष्य केले होते.

यामुळे अखेर योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. अखेर सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतली आहे. 

हाथरसमधील 19 वर्षांत्या दलित युवतीवर चार जणांनी अत्याचार केला होता. ही घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती. नंतर उपचारादरम्यान दिल्लीतील रुग्णालयात त्या युवतीचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट पसरलीआहे. यातच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने त्या पीडितेच्या कुटुंबीयांना विश्वासात न घेता परस्पर तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. पोलिसांनी या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख