Confusion due to placing Sambhaji Raje in the third row...  | Sarkarnama

सारथीच्या बैठकीत संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत बसविल्याने गोंधळ...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 9 जुलै 2020

 संभाजीराजे यांना व्यासपीठावर न बोलविण्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. 

मुंबई : सारथी संस्थेच्या मुद्दावर सध्या राजकारण खूपच तापलं आहे. आज मुंबईत आयोजित बैठकीत खासदार संभाजीराजें यांना सभागृहातील तिसऱ्या क्रमांकाच्या रांगेतील खूर्चीवर बसल्यावरून वातावरण आणखीचं तापलं. शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थीकरून या प्रकरणावर पडद्या टाकण्याचा प्रयत्न केला. संभाजीराजे यांना व्यासपीठावर न बोलविण्यामुळे त्यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. 

सारथीच्या प्रश्नावर आयोजित बैठकीत अजित पवार यांनी खासदार संभाजीराजेंना फोन करून बोलावलं होतं.  या बैठकीला संभाजीराजेंसह मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले आहे. दोन दिवसापूर्वी या बैठकीबाबत मंत्री विजय वड्डेटीवार यांनी माहिती दिली होती. यावेळी संभाजीराजे यांनी त्यांच्या समर्थकांना आवाहन केले. तरीही गोंधळ सुरू होता. यानंतर अजित पवार यांनी यामध्ये मध्यस्थी केली. संभाजीराजें यांना व्यासपीठावर येण्याचा आग्रह केला. परंतु संभाजी राजे तिसऱ्या रांगेत बसले. संभाजीराजे म्हणाले, ''समाजासाठी आपण मान अपमान न मानता बैठक करु. आपल्याला समाज महत्वाचा आहे. निर्णय महत्वाचा आहे. सारथी महत्वाची आहे.''

यानंतर बैठक संपून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात त्यांनी संभाजीराजे व मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची चर्चा केली. सारथी संस्थेचे अनुदान, स्वायत्तता, शिष्यवृत्ती, तारदूत प्रकल्प याविषयावरून काही दिवसापासून ठाकरे सरकारवर टिका होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने सारथी संस्था उभी राहिली आहे. ती बंद पडण्यासाठी प्रयत्न झाले. परंतु आम्ही ते होऊ दिले नाही.  गरिबातील गरीब मराठा समाज यातून उभा राहणार आहे. फेलोशिप आणि स्कॉलरशीप सारथीच्या माध्यमातून मिळत असल्याचेही संभाजीराजे यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते. सरकारने  यापूर्वी जी आश्वासने दिली ती पाळली गेली नाहीत. तरीही समाजाच्या हितासाठी आपण या चर्चेला जात असल्याचं छत्रपती संभाजी यांनी यावेळी म्हटलं आहे. सारथी संस्थेला भाजपपेक्षा महाविकास आघाडी सरकारने जादा निधी दिल्याचा दावा मंत्री विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. याबाबत त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
विजय वडेट्टीवार म्हणाले, ''सारथी संस्थेची स्थापना 3 जानेवारी 2017 रोजी झाली. 2017-2018 या दरम्यान सारथीसाठी कुठलेली आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. 2018-2019 या वर्षी संस्थेला पाच कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. यात साडेतीन कोटी रूपये संस्थेच्या अन्य  खर्चावर व दीड कोटी रूपये हे वेतनावर खर्च करण्यात आले. 2019-2020 या वर्षी 28.80 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला. 2020-2021 या वर्षी महाविकास आघाडीच्या सरकारने 50 कोटींचा निधी सारथीला दिला.''

Edited  by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख