या चार जिल्हाप्रमुखांना हटवा, नाही तर काही खरे नाही : थेट उद्धव ठाकरेंकडे तक्रार

तीन प्रमुख नेत्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांवर उध्दव ठाकरे काय तोडगा काढतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Sarkarnama (53).jpg
Sarkarnama (53).jpg

सोलापूर  : सोलापूरच्या शिवसेनेत Shiv Sena कार्यरत असलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठा चांगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही सगळी मंडळी शिवसेना वाढविण्यास कमी पडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुका आपण जिंकू शकत नाही. आम्हाला कुठल्याही गटबाजीत पडायचे नसून आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सोलापूरच्या शिवसेना पक्ष संघटनेत बदल करावा, अशी मागणी करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे, मोहोळचे शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर यांनी केली आहे. 

या मागणीचे पत्र त्यांनी थेट मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांना समक्ष भेट घेऊन दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असूनही जिल्ह्यातील आणि तालुक्‍यातील शिवसेनेत खदखद आणि आपलीच कामे होत नसल्याचे आता समोर आले आहे. आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सध्याच्या पक्षसंघटनेत खूप मोठे बदल करणे गरजेचे असल्याचे सांगून सोलापुरातील चार जिल्हा प्रमुखांवर या तिघांनी एक प्रकारे अविश्‍वासच व्यक्त केला आहे. ज्यांना आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचे आहे अशाच लोकांना पक्षसंघटनेत स्थान दिले तर पक्षवाढीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होईल असा विश्‍वासही या तिघांनी या पत्रात व्यक्त केला आहे. शिवसेनेतील या तीन प्रमुख नेत्यांनी मांडलेल्या प्रश्‍नांवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय तोडगा काढतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीकडे आहे. पालकमंत्री राष्ट्रवादीचे झाले आणि आमच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला अशीच स्थिती असल्याची कैफियतही या पत्रात मांडण्यात आली आहे. जिल्ह्यातील कोणतेही अधिकारी आमचे काम करत नाहीत. जिल्हाधिकारी हे देखील फक्त राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांची कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आपल्या शासनाने केलेली कामे राष्ट्रवादीचे आमदार स्वतःच्या नावावर प्रसिद्ध करतात. त्यामध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे आघाडीवर असतात आणि शिवसेनेची गोची करत असल्याचीही तक्रार या पत्रात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com