राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांनीच केलं उघड - The communication format is violative of all norms by Governor says West Bengal government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राजकारण तापलं; मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांनीच केलं उघड

वृत्तसंस्था
बुधवार, 16 जून 2021

दिल्लीला रवाना होण्याआधी राज्यपालांनी हे पत्र लिहिलं आहे.

कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबाबत राज्यपाल जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवर पोस्ट करून सार्वजनिक केलं. त्यानंतर बंगाल सरकारने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून राज्यपाल व मुख्यमंत्र्यांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (The communication format is violative of all norms by Governor says West Bengal government)

विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची गंभीर दखल राज्यपाल जगदीप धनखर यांनी घेतली आहे. राज्यातील कायदा-सुव्यस्थेच्या स्थितीचा ते सातत्याने आढावा घेत आहेत. तर मंगळवारी रात्री ते दिल्लीला रवाना झाले. त्याआधी त्यांनी मुख्यमंत्री बॅनर्जी यांना पत्र लिहिलं आहे. हे पत्र त्यांनी ट्विटरवर शेअर केले. या पत्रामध्ये त्यांनी हिंसाचारावर मुख्यमंत्री गप्प असून पीडितांना भरपाई देण्याबाबत कोणतीही पावसे उछलली नसल्याचा आरोप केला आहे. 

हेही वाचा : भाजप आमदारांच्या भेटीनंतर राज्यपाल दिल्लीत; पंतप्रधान, गृहमंत्र्यांना भेटण्याची शक्यता

हे पत्र राज्यपालांनी सार्वजनिक केल्यानंतर राज्याच्या गृह विभागानेही ट्विटरवरून राज्यपालांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी सार्वजनिक केलेल्या पत्रातील मजकूर तथ्यांवर आधारीत नाही. तसेच त्यांनी प्रोटोकॅालचे उल्लंघन केलं आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक केल्याच्या या कृतीमुळे बंगाल सरकार हैराण झाले आहे. कारण त्यातील आशय सत्य नाही. हिंसाचार घडला त्यावेळी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोकाकडे होती. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर ही स्थिती सुधारली, असे गृह विभागाने म्हटलं आहे. राज्यातील पोलिस यंत्रणेने समाजविघातक घटकांवर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. समाजामध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, असेही गृह विभागाने स्पष्ट केलं आहे. 

राज्यपालांनी काय म्हटलंय पत्रात?

राज्यात निवडणूकीनंतर झालेला रक्तपाद, मानवाधिकारांचे उल्लंघन, महिलांवर अत्याचार, संपत्तीचे नुकसान, राजकीय विरोधकांवर झालेल्या हल्ल्लांबाबत आपली निष्क्रियता यामुळं मी दु:खी झालो आहे. तुम्ही यावर गप्प असून पीडितांना भरपाई देण्याबाबतही पावले उचलली नाहीत. यातून हे सरकारनेच केल्याचा निष्कर्ष निघतो. अटक केलेल्या व्यक्तींच्या सुटकेसाठी मुख्यमंत्री 17 मे रोजी अभूतपूर्व पध्दतीने सीबीआय कार्यालयात सहा तास घालवले, असे राज्यपालांनी म्हटले आहे. तसेच राज्यात कायदा-सुव्यवस्था नियंत्रित करणे आणि पीडितांना मदत करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.

राज्यपाल दोन दिवस दिल्लीत

राज्यपाल दिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद व गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याची शक्यता आहे. त्यांना बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराचा अहवाल ते सादर करतील, अशी चर्चा आहे. भाजपनेही हा मुद्या उचलून धरल्याने सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केलं जात आहे. तृणमूल काँग्रेसनेच हा हिंसाचार घडवून आणल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर ममतादीदींनी भाजपकडे बोट दाखविले आहे. 

निकालानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून खून करण्यात आले. महिलांवर अत्याचार करण्यात आले, असे अनेक गंभीर आरोप भाजपने केले आहेत. या हिंसाचारामध्ये तृणमूलच्या काही कार्यकर्त्यांचाही मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या हिंसाचारानंतर राज्यपालांनी राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलिस महासंचालकांची बैठक घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयाचे एक पथक हिंसाचार झालेल्या भागाची पाहणीही करून गेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख