ईडीकडून शिवसेनेच्या दोन नेत्यांची चैाकशी सुरु ; चंद्रकांतदादांचा गैाप्यस्फोट - cm uddhav thackerays pa milind narvekar on ed radar says chandrakant patil | Politics Marathi News - Sarkarnama

ईडीकडून शिवसेनेच्या दोन नेत्यांची चैाकशी सुरु ; चंद्रकांतदादांचा गैाप्यस्फोट

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 17 जुलै 2021

अनिल परब व मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची चौकशी सुरू आहे

नाशिक : माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांची वेगवेगळ्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सध्या चौकशी सुरू आहे. अजून शिवसेनेच्या दोन नेत्यांचीही चैाकशी सुरु असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील Chandrakant Patil, यांनी दिली आहे. 

''परिवहन मंत्री अनिल परब व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याची चौकशी सुरू आहे,'' अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.  ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी काल रात्रीपासून नाशिक दैाऱ्यावर आहेत.

''रात्रीतून कोणालाही अटक होऊ शकते,'' असे वक्तव्य पाटील यांनी काल केलं होते. त्याच्या या विधानावर अनेक तर्क लावले जात होते. त्यावर ते आज म्हणाले, ''मी काल रात्री कोणालाही अटक होऊ शकते असे म्हटलो होतो पण माझा रोख कुणाकडेही नव्हता. सध्या अनेक जणांची चैाकशी सुरू आहे. त्या चैाकशी अटकेच्या दिशेने आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआयने चैाकशी करावी, म्हणून कोणीतरी न्यायालयात गेलं आहे. तर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनाही न्यायालयानं फटकारलं आहे. अनिल परब, मिलिंद नार्वेकर बंगल्याची चौकशी सुरु आहे. माजी मंत्री अनिल राठोड यांच्यावरील खटला प्रलंबित आहे.''

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानामुळे महाविकास आघाडी सरकारध्ये फूट पडेल, असे तुम्हाला वाटते का, या प्रश्नाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. नाना पटोले यांच्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ''सध्या तीन पक्षाचं सरकार आहे. ते रोज सकाळी गेम तयार करतात. त्यात ठरत की आज कोणी काय गेम खेळायचा हे ठरते. त्यातील एक जण मारल्यासारख्या करतो, एक लागल्यासारखं करतो अन् तिसरा समजविण्याचे काम करतो, असं त्याचं सुरु असतं. हा सर्व गेम सुरु आहे. पण जनतेलाही हे माहित आहे. ते आगामी निवडणुकीची वाट पाहत आहेत.''
 
महाविकास आघाडी सरकारवर प्रशासनाचा वचक नाही. पोलिस अधिकारी वेगवेगळ्या गैरव्यवहारात सापडले आहेत. कायद्याचा वचक राज्यात नाही. फडणवीस सरकार असताना गुन्हा झाल्यावर त्यांच्या लगेल तपास केला जात होता. तेव्हा गुन्हाचं प्रमाण ९ टक्क्यांवर होतं आता ते ५३ टक्क्यांवर आले आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

शिवसेने सोबत आमचा पंगा नाही
शिवसेनेबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, ''शिवसेने बरोबर आमचे वैर नाही, महाविकास आघाडी सरकार विरोधात आमचे आंदोलन आहे. शिवसेने सोबत आमचा पंगा नाही. आमच्या जागा जास्त असताना देखील केवळ मुख्यमंत्री पद मिळालं नाही, म्हणून वेगळ्या विचारांच्या पक्षाबरोबर सरकार स्थापन करण मान्य नाही. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणत तत्व, स्वाभिमान, निष्ठा गुंडाळून ठेवलं आहे. सत्ता असं फेविकोल आहे की ती सोडणं अशक्य असतं. आजतरी शिवसेने सोबत सरकार स्थापन करणं शक्य वाटत नाही."
Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख