`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो!.. हो ना अजितदादा?` - CM uddhav thackeray says we finished night work in day | Politics Marathi News - Sarkarnama

`रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो!.. हो ना अजितदादा?`

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

पुढील काही वर्षे आमच्या सरकारला तुमचे सहकार्य असेच राहू द्या, अशी मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोमणा मारला. 

मुंबई : आरेच्या जंगलात मेट्रोसाठी रात्रीची वृक्षतोड केल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांना मारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  रात्री चालणारी कामे आम्ही दिवसाढवळ्या करतो, हो ना अजितदादा, असे विधान करत एकाच वेळी एका दगडात दोन पक्षी मारले. 

विधानसभेच्या अधिवेशनाचा समारोप करताना ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोरोना संकटात सरकारला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

``मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो. हे संकट म्हणजे विष्णुबरोबरचे युद्ध आहे. रुग्णसंख्येतील वाढ आपण मर्यादित ठेवली. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाचे संकट इतक्या लवकर संपेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळेढे आपल्याला गाफील राहून चालणार नाही. प्रत्येक पाऊल दक्षतेने टाकावं लागेल. हिमाचल प्रदेश येथील विधानसभेच्या अध्यक्षांनी सदस्यांना सांगितलं की ओरडून बोलल्यामुळे कोरोना होतो. (टोला) पुढच्या अधिवेशनात हे आपण पाळू या, असे त्यांनी सांगितले. 

``आपण अनलाॅक करायला सुरवात केली आहे. सरकारने अनेक गोष्टी जबाबदारीने पार पाडल्या. सुमारे 19.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केली. काम करताना इगो असता काम नये. तसा शॉर्ट कट मारू नये (फडणवीस यांना टोला). रात्री चालणारी काम आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत! बरोबर ना दादा? आरे कार शेडसाठी जो खर्च झाला तो वाया जाऊ देणार नाही. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणूज घोषित केले. मुंबईसाठी सोयीसुविधा देत असताना आपले वन्यप्राण्यांसोबतचे सहजीवन आरेमुळे कायम राहू शकेल.

कोरोनाला अटकावासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा ठाकरे यांनी या वेळी केली. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात जाऊन टीम चौकशी करणार आहे. त्यानंतर आवश्यक वाटणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात येईल. आता झोपडपट्टीपेक्षा इमारतीमध्ये जास्त कोरोनाग्रस्त पाहायला मिळतात. त्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख