..तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळच येणार नाही : उद्धव ठाकरे (व्हिडिओ)

राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहे
CM Uddhav Thackeray on Solapur Tour
CM Uddhav Thackeray on Solapur Tour

अक्कलकोट : राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. राज्य सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. राज्यात पुरग्रस्त शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून राज्याचा कारभार करीत आहेत, ठाकरे यांनी घराबाहेर पडून पुरग्रस्तांची पाहणी करावी. या संकटात लढण्यासाठी जनतेला, शेतकऱ्यांना  बळ द्यावे, अशी अपेक्षा विरोधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केली जात होती. आज मुख्यमंत्री हे पुरग्रस्तभागाची पाहणी करण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. ते सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दैाऱ्यावर आहेत. 

सकाळी अक्कलकोट येथे आल्यानंतर ठाकरे यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या अन्नछत्राचे दर्शन घेतले. त्यानंतर पुढील दौऱ्यावर जाण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही पुरग्रस्तांच्या घरात जाऊन पाहणी केली. रामपूर गावात त्यांनी ग्रामस्थांची विचारपूस केली.  नागरिकांना तातडीने मदत करावी, असे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

ठाकरे म्हणाले, "आताही अतीवृष्टीचा इशारा दिला गेला आहे. सुदैवाने आज उघडीप आहे. सर्व जनतेला दिलासा देतो आहोत. प्राणहानी होता कामा नये ही आमची भावना आहे. पाऊस पुन्हा येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे. मात्र, जी परिस्थिती उद्भवली आहे ती सावरण्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. पंचनामे सुरु आहेत. माहिती घेत आहोत. मदतीला सुरुवातही केली आहे. आम्ही फक्त माहिती घेत बसणार नाही. आम्ही कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही,'' 

''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले तसे आम्ही पंतप्रधानांना विनंती करणार आहोत. काही ठिकाणी पाण्याचा लोंढा अनपेक्षितपणे आला. त्यातून मनुष्यहानी झाली. प्राण्यांची हानी झाली. ७० सालानंतर एवढे पाणी आले. आता पूनर्वसन करताना ही पूररेषा लक्षात घेतली जाईल. मात्र, नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावे, गाफील राहू नये,'' असेही ठाकरे म्हणाले. 

विरोधी पक्ष म्हणतो तितकी यंत्रणा राबवली जात नाहीये. केंद्राकडेच हात पसरण्याची वेळ येते आहे, याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, " केंद्राने राज्याचे देणे वेळेवर देत गेले तर केंद्राकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही. केंद्र व राज्य असा दुजाभाव विरोधी पक्षांनी करु नये. कारण एकेकाळी तेही सत्तेवर होते. राज्य सरकार जे जे शक्य आहे ते करणारच आहे. आपत्तीग्रस्तांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही,'' 
Edited By- Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com