राज्यात 15 दिवसांचा लाॅकडाऊन : आता दिवसाही संचारबंदी; गरिबांसाठी मदतीची घोषणा

राज्यात जीव वाचविण्याला महत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन
uddhav mantarlay
uddhav mantarlay

मुंबई : राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी दिवसाची देखील संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. पुढील 15 दिवसांसाठी (चौदा एप्रिल ते 30 एप्रिल) ही संचारबंदी राहणार आहे. सध्या रात्रीची असलेली संचारबंदी दिवसादेखील लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला दिलेल्या संदेशात जाहीर केला. अनावश्यक सर्व कामे, उद्योग बंद राहणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत या अत्यावश्यक सेवा सुरू राहणार.

-लोकल, बससेवा बंद होणार नाही. फक्त आवश्यक कामांवरील कर्मचाऱ्यांसाठीच याचा वापर करता येईल.

रुग्णालये, वैद्यकीय, विमा, लसउत्पादन, औषधनिर्मिती, जनावरे, प्राण्यांचे दवाखाने सुरू राहतील.

-पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू राहतील.

-सेबी, रिझर्व्ह बॅंक, पेट्रोल पंप, कार्गो सेवा, खासगी व सुरक्षा मंडळे सुरू राहणार.

- पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघात मतदान होईपर्यंत म्हणजे 17 एप्रिलपर्यंत नवे निर्बंध लागू नसतील.

-रेस्टाॅरंटस आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थांचे स्टाॅल येथे फक्त पार्सल सेवा सुरू राहील. 

-आॅक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हवाई दलाची मदत मिळावी, अशी पंतप्रधानांकडे मागणी

-कोरोनामुळे अनेकांचा रोजगार धोक्यात आला आहे. अशांना आर्थिक मदतीची गरज आहे. ती देण्याची केंद्रांकडे मागणी

-लसीकरणासाठी मोहीम राबवूच पण त्यासाठी केंद्र सरकारने अधिक पुरवठा करावा.

-ब्रिटनच्या मार्गाने आपल्याला जावे लागेल. भरपूर लसीकरण वाढवावे लागेल. पुढच्या लाटेचा वेग थोपविण्याची गरज आहे.

-रेमडिसिव्हर औषधाची टंचाई आहे. ती दूर करण्याची गरज आहे.

-गेल्या वर्षी आपण कोविडवर नियंत्रण मिळवले. पण या वेळची लाट अधिक तीव्र आहे.

-राज्याची आरोग्यव्यवस्था वाढवली. पण ती तोडकी पडते आहे.

-रुग्णवाढ भयावह आहे. बेडची संख्या टंचाई जाणवत आहे.

-मात्र आरोग्यव्यवस्था वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. 

-निवृत्त आरोग्यसेवकांनी कोरोनाच्या लढाईत सहभागी व्हावे

-राजकारण दूर ठेवा, असे माझे सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे. 

-शिवभोजन थाळी मोफत देणार. रोज किमान दोन लाख जणांना सध्या याचा लाभ देण्यात येत आहे.

-महिनाभरासाठी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देणार

-संजय गांधी, श्रावणबाळ आदी योजनांतील लाभार्थ्यांना पुढील महिन्याची रक्कम आगाऊ देणार

-बांधकाम कामगारांना 1500 रुपये प्रत्येकी देणार. सुमारे बारा लाख कामगारांना त्याचा फायदा मिळणार

-नोंदणीकृत घरेलू कामगाांनाही प्रत्येक 1500 रुपये देणार

-अधिकृत फेरीवाले,  परवाना रिक्षाचालक यांना 1500 रुपये देणार. त्यात बारा लाख रिक्षाचालक आहेत. 

-आदिवासी समाजासाठी खावटी योजनेंतर्गत प्रति कुटुंब 2500 रुपये मिळणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com