Oxygen च्या टंचाईमुळे मलाही एसीत घाम फुटतो.... : मुख्यमंत्र्यांनी सांगितली भीषण स्थिती

लसीकरणासाठी गर्दी न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
uddhav mantarlay
uddhav mantarlay

मुंबई : राज्यात18 ते 44 या वयोगटात सहा कोटी नागरिक आहेत. त्यासाठी बारा कोटी डोसेज राज्याला लागणार. बारा कोटी डोसेज ही एकरकमी चेकने घेण्याची आपली तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत या संकटातून आपल्याला बाहेर पडायचे आहे. मात्र ज्या प्रमाणात लशीचा पुरवठ्याला मर्यादा आहेत. ज्या कंपन्यांच्या लशींना परवानगी मिळेल त्या सर्वांशी आम्ही बोलतो आहे. भारत बायोटेक आणि सिरम या दोन्हींकडून मे महिन्यात 18 ते 44 गटासाठी फक्त 18 लाख डोस मिळणार आहेत. त्यामुळे लसीकरणासाठी गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कोरोनाच्या परिस्थितीवर त्यांनी राज्याला सोशल मिडियातून मार्गदर्शन केले. आपल्याला भडकावयचा काही जणांनी प्रयत्न केले. मात्र त्याविषयी मी बोलणार नाही. मला राजकारण करायचे नाही. जेव्हा सभांमधून बोलायचे तेव्हा बोलेन, असा इशारा त्यांनी विरोधकांनी दिला. लग्न समारंभासाठी दोन तासांचीच परवानगी का, यावरही त्यांनी सविस्तर विश्लेषण केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे

-ज्याप्रमाणे ब्रिटनने लसीकरण मोठ्या प्रमाणात केले त्याच प्रमाणात आपण करणार आहोत.

-एक मे 2021 पासून 18 ते 44 पासून लसीकरण सुरू करणार आहोत. प्रत्येक राज्याला लसीकरणासाठी स्वतंत्र अॅप करून देण्याची परवानगी मागितली आहे. अॅपवरती नोंदणी करूनच लस केंद्रावर जा. 

-लसीकरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी सर्वांना बंधने पाळणे गरजेचे आहे. सर्वांना लस मिळेल, याची मी खात्री देतो.

-लसीकरण केंद्र हे कोव्हिड प्रसारण केंद्र ठरू नये. म्हणून हात जोडून मी विनंती करतोय. जसजशी लस मिळेल तशा सुविधा वाढविता येतील.

-रोज दहा लाख डोस देण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. मात्र लस मिळत नसल्याने मर्यादा आल्या आहेत.  

-लसीकरणाला जानेवारी 2021 मध्ये सुरवात झाली. एक कोटी 58 लाख नागरिकांना लस दिली. चाचण्या, आरोग्यसुविधा आणि रुग्णवाढीतही आपण इतर राज्यांच्या पुढे आहोत.

-लाॅकडाऊन लावला नसता तर काय परिस्थिती झाली असती हे इतर राज्यांतील स्थिती पाहून कळते.

-कोरोनाची तिसरी लाट आली तरी घातक परिणाम होऊ देणार, यासाठी कंबर कसून सरकारने केली आहे.

-तिसरी लाट आल्यानंतर थोडेफार निर्बंध लावण्याची गरज वाटली तरी अर्थचक्र थांबणार नाही, याची काळजी घेऊ.

-तिसरी लाट सर्वांच्या सहकार्याने थोपवू.

-रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही, हा माझा प्रयत्न आहे.

-शिवभोजनथाळी मोफत देत आहोत. मोफतची घोषणा केल्यापासून 15 लाखांहून अधिक लोकांना त्याचा उपयोग झाला. जवळपास चार कोटी जनतेला लाभ झाला आहे. 890 शिवभोजन केंद्र सुरू झाले आहेत.

-संजय गांधी, श्रावणबाळ आदी योजनांद्वारे 35 लाख लाभार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये दिले आहेत. 

-आपल्या मागे कोरोनाचे दृष्टचक्र लागलेय, ते कळत नाही.

-महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी झालेल्या कार्यक्रमाची आज आठवण येतेय

-उच्च न्यायालयाने अधिक कठोर बंधने लावण्याबाबतची विचारणा केली आहे. मी जनतेला आता हे विचारत आहे. मात्र तशी वेळ येणार नाही, हे नागरिकांच्या प्रतिसादावरून दिसून येत आहे.

-या बंधनाचा आपल्याला का उपयोग झाला? रुग्णसंख्या ओसरली का? तर नाही ओसरली. मात्र लाॅकडाऊन नसता तर वेगाने ही रुग्णवाढ वाढली असती तर दहा लाखांवर रुग्णांची संख्या पोहोचली असती.

-लाॅकडाऊनमुळे रुग्णवाढीचा वेग कमी झाला नसला तरी स्थिरावला आहे. लाॅकडाऊन नसता तर काय झाले असते, याचा विचारही नको.

-इतरांनी काय चांगले केले आहे त्याचे अनुकरण करायला मी तयार आहे.

-गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला तेव्हा फक्त दोन प्रयोगशाळा होत्या. त्यांची संख्या आता 609 झाली आहे. चाचण्यांची संख्या तीन लाखांवर नेल्या आहेत. 

-आरोग्यसुविधा वाढविता आहोत. कोविड सेंटर्सची संख्या जून 2000 मध्ये 2500 पाच हजार केली आहे.

-गेल्या जूनमध्ये बेडची संख्या दोन लाखांहून चार लाख केल्या आहेत. आयसीयू बेड हे 11 हजाराहून 28 हजार केली. जून 2020 मध्ये 3740 वरून 11713 एवढे व्हेंटिलेटर्स आता वाढविण्यात आले आहेत.

-आॅक्सिजन मोठ्या प्रमाणात लागत आहे. त्याच्या टंचाईमुळे मी एसीमध्ये बसलो तरी घाम फुटतोय, अशी परिस्थिती. 

-रेमडिसिव्हिरची रोजची मागणी ही सरासरी 50 हजार आहे. पण केंद्र सरकारकडून 35 हजार पुरवठा होत आहे. गरज नसताना हे औषध दिले तर त्याचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे.

- तालुका आणि जिल्हा रुग्णालयांत आॅक्सिजन निर्मितीची केंद्रे उभारण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या बैठकीत दिल्या आहेत. काही ठिकाणी काम सुरू केलेले आहे. येत्या काही दिवसांत सर्व प्लॅन्स सुरू होतील. कोविडच्या तिसऱ्या लाटेत आॅक्सिजन कमी पडणार नाही, याची खात्री आहे.

-लिक्विड आॅक्सिजनची ने आण करता येऊ शकते. पण गॅस आॅक्सिजन वाहून नेता येत नाही. पण त्यासाठी गॅस आॅक्सिजनच्या ठिकाणीच कोविड सेंटर करतो आहेत. त्यात खापरकखेडा, जिंदाल स्टिल येथे, लाॅईड स्टिल (वर्धा) या ठिकाणी ही केंद्रे सुरू करता येतील. 

- राज्य सरकार 275 आॅक्सिजन प्लॅंट उभारणार आहे. आज राज्यात मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या पाच प्रमुख कंपन्या. तसेच इतर छोटे उत्पादक मिळून राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता १२७० टन इतकी आहे
 
-जेएसडब्ल्यू स्टील यांनी अतिरिक्त ८० मे. टन उत्पादन वाढवले आहे. केंद्र शासनाने निश्चित केलेला कोटा १७८४ टन. त्यात राज्यातील व राज्याबाहेरील उत्पादकांचा समावेश.राज्यात सध्या १६५० मेट्रीक टन ऑक्सिजन आवश्यकता. 

-आजच्या घडीला खालीलप्रमाणे इतर राज्यांतून ऑक्सिजन मिळतोय :

भिलाई, छत्तीसगड १०० टन (Actual allocation १३०) 
बेल्लारी कर्नाटक १०० टन (Actual allocation १४०) 
रिलायन्स, गुजरात १०० टन (Actual allocation १२५)

-केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्यासाठी १८१४ मे.टन ऑक्सिजनचा कोटा निश्चित केलेला असला तरी प्रत्यक्षात कसा बसा १६५० मे.टन पर्यंत ऑक्सिजन राज्यास उपलब्ध होत आहे.   

-विशाखापट्टणम येथून ७ टँकर घेऊन निघालेल्या विशेष रेल्वे व्दारा १०० टन ऑक्सिजन राज्यासाठी प्राप्त झाला.

-हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रात बसविणे सुरु 

-ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये हे प्लांट.  एका प्लांटमधून दररोज सुमारे २ टन (९६० एलपीएम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन सुमारे २०० ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा करता येऊ शकतो.

-मुंबई महापालिका १२ रुग्‍णालयांमध्‍ये १६ ऑक्सिजन प्‍लांट उभारत आहे. या सर्व १६ प्रकल्‍पांतून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे. ३५ जिल्ह्यांतून ३०९ प्लांट्सपैकी  २१ कार्यरत. २७ मेट्रिक टन पुरवठा सुरु  २८० प्रस्तावित. लवकरच ३५१ मेट्रिक टन पुरवठा सुरु होईल. १९००० बेड्सना ऑक्सिजन देणे शक्य

-महाजेनकोच्या खापरखेडा, अकोला आणि परळी येथील केंद्रानजीक मोठ्या प्रमाणावर जम्बो सुविधा उभारण्यात येत असून त्याठिकाणी थेट रुग्णांना ऑक्सिजन मिळेल याची व्यवस्था करण्यात येत आहे. रिलायन्सच्या नागोठणे प्रकल्पाजवळ जम्बो केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे  

-पेणमधील जेएसडब्ल्यू कंपनीच्या रुग्णालयात लवकरच जम्बो कोविड सेंटर सुरु होत आहे. लॉंयड स्टील, वर्धा परिसरात १००० बेड्सची जम्बो सुविधा उभारणार

-गेले वर्ष ताणतणावाचे गेले आहे. डाॅक्टर्स मंडळी, आरोग्य यंत्राणाही ताणात आहे. तसेच येथील यंत्रेही न थांबता चालत असल्याने त्यात बिघाड होण्याच्या घटना घडतात. त्यातून नाशिक येथील दुर्घटना घडली. त्यासाठी मी नाशिक येथील आरोग्य कर्मचाऱ्यांशी बोललो. त्या वेळी ते कर्मचारी माझ्याशी बोलताना रडले. परभणीमध्ये आॅक्सिजनच्या वाहिनीवर झाड कोसळले. मात्र मोठा अनर्थ टळला. 

-जम्बो कोविड सेंटर उभारताना पाणी साचणार नाही, आग लागणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. एक कुटुंब म्हणून काम करण्याची आता गरज आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com