CM TO PM : पंतप्रधान मोदींचा दोन दशकाचा यशस्वी राजकीय प्रवास !  - CM TO PM: Prime Minister Modi's successful political journey of two decades! | Politics Marathi News - Sarkarnama

CM TO PM : पंतप्रधान मोदींचा दोन दशकाचा यशस्वी राजकीय प्रवास ! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 ऑक्टोबर 2020

भाजपने मोदी यांना आजच्याच दिवशी, 7 ऑक्‍टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतून पाठविले होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकीर्दीला आज 20 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सत्तारूढ भाजपने मोदींच्या कामगिरीतील निवडक 20 घटनांची जंत्री दिली आहे. संघाचा कार्यकर्ता ते भाजपमधील संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि गुजरातचे मुख्यमंत्री ते भारताचे पंतप्रधान, या मोदी यांच्या प्रवासातील 20 निवडक उल्लेखनीय घटनांचा एक खास व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे. 

Narendra Modi completes 12 years as Gujarat chief minister - India News

भाजपने मोदी यांना आजच्याच दिवशी, 7 ऑक्‍टोबर 2001 रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतून पाठविले होते. भाजपने म्हटले की गुजरातच्या मुख्यमंत्रीपदापासून जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासात नरेंद्र मोदी हे लोककल्याणासाठी एक योध्दे म्हणून सदैव सक्रिय राहिले आहेत. 

मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने गुजरातमध्ये जिंकलेल्या सलग चार विधानसभा निवडणुका व पंतप्रधान म्हणून देशपातळीवर दोन लोकसभा निवडणुकांतील विजयांची जंत्री या व्हिडीओमध्ये आहे. गुजरातमधील व्हायब्रंट गुजरात गुंतवणूकदार परिषद, सरकार वल्लभभाई पटेल यांचा "स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वांत उंच पुतळा देशाला अर्पण. "कन्या केलवणी',"बेटी बचाओ', "ज्योतिग्राम', ई-ग्राम, विश्व-ग्राम आदी योजनांचा यात उल्लेख आहे. त्याचबरोबर गेल्या सहा वर्षांत केंद्रातील मोदी सरकारच्या काळातील जीएसटी, नोटबंदी व कोरोना लॉकडाऊनपासून या महामारीशी लढण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखालील विविध योजनांचा यात समावेश आहे. 

2002 Gujarat riots: Nanavati Commission gives clean chit to ex-CM Narendra  Modi | India News – India TV

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डापासून ते केंद्रातील अनेक मंत्र्यांनी मोदींच्या वाटचालीचे तोंडभरून कौतुक केले आहे. मुख्यमंत्री, पंतप्रधान म्हणून मोदींनी घेतलेले निर्णयाचेही नागरिकांना आठवण करून दिली आहे. 

नड्डा यांनी म्हटले आहे, की 7 ऑक्‍टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यांची लोकप्रियता कधीही कमी झाली नाही तर ती दिवसेदिवस वाढतच गेली. 

World now paying more attention to India: PM Modi - Rajya Sabha TV

केंद्रातील एक मंत्री हरदिपसिंह पुरी यांनीही त्यांच्या मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदापर्यंतच्या प्रवासाचे तोंडभरून कौतुक केले आहे. मोदी यांनी गेल्या वीस वर्षात भारत मातेसाठी आणि मानवतेसाठी समर्पण आणि निस्वार्थीपणे काम केले आहे. 

गेल्या वीस वर्षात मोदी हे निवडणुकीच्या रिंगणात कधीही पराभूत झाले नाहीत. मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला केंद्रात दोन वेळा बहुमत मिळाले आहे याचा भाजप कार्यकर्त्यांना सार्थ अभिमान आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख