फडणवीस-ठाकरे यांच्यातील १० मिनिटांच्या चर्चेत नेमकं काय घडलं असेल? 

दोघांमध्ये विस्तव जात नाही अशी स्थिती नाही. पण फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.
2Sarkarnama_20Banner_20_202021_03_08T185911.479.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_03_08T185911.479.jpg

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक काल झाली. या बैठकीला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, devendra fadnavis कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित होते.  राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित नेत्यांची मते जाणून घेतली. पुढील आठवड्यात या विषयावर पुन्हा बैठक होणार आहे.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण कसं देता येईल हा या बैठकीचा मुद्दा होता. मात्र या बैठकीपेक्षा चर्चा रंगली आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  cm thackerayआणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बंद खोलीतल्या चर्चेची. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची चर्चा रंगली होती. आता ओबीसी आरक्षणाबाबत काल झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात बंद खोलीत काय बोलणं झालं असेल याची चर्चा रंगली आहे. पुढील वर्षी राज्यात मुंबईसह १८ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली का? की पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांची घोषणा ; सोनू सूद महत्वाकांक्षी योजनेचा ब्रँड अम्बेसिडर
दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 10 मिनिटं चर्चा झाली.  2019 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर बंद दाराआडची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती. फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही एकमेकांचे राजकारणातले विरोधक आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनी जरी विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढवली होती तरीही नंतर मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षे वाटून घेण्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेत जुंपली आणि त्यांचा पंचवीस वर्षांचा युतीचा संसार मोडला. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हातात आलेलं मुख्यमंत्रीपद गेल्याने फडणवीस चांगलेच दुखावले. मात्र आता दोघांमध्ये विस्तव जात नाही अशी स्थिती नाही. पण फडणवीस ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.   

सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर प्रथम मुख्यमंत्री ठाकरे, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांची साधारण दहा मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर दरेकर तिथून निघाले व उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात १० ते १५ मिनिटं चर्चा झाली, अशी माहिती मिळत आहे. या चर्चेचा तपशील मिळाला नसला तरी शिवसेना-भाजपमधील तणाव या मुद्द्यावर ही चर्चा झाल्याची अधिक शक्यता आहे.
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com