वाघ आहे मी, लक्षात ठेवा….कोल्ह्या-कुत्र्यांना घाबरणारी नाही!

चित्रा वाघ यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.
Chitra Wagh slams Mehboob Shaikh over controvericial comment
Chitra Wagh slams Mehboob Shaikh over controvericial comment

मुंबई : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सोमवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. शेख यांनी वाघ यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्याला प्रत्युत्तर देताना 'वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही', असं ट्विट केलं आहे. (Chitra Wagh slams Mehboob Shaikh over controvericial comment)

चित्रा वाघ यांनी नुकतीच आमदार निलेश लंके यांच्यावर टीका केली होती. तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आरोपांवरून लंके यांच्यावर भाजप नेते निशाणा साधत आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते लंके यांच्या ठामपणे पाठिशी उभे राहत आहेत. मेहबूब शेख यांनीही लंके यांच्यावर वाघ यांनी केलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिलं होतं. यावरून चित्रा वाघ संतापल्या असून त्यांनी ट्विट करत शेख यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 

'वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण, मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू. मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही,' असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे. 

काय म्हणाले होते मेहबूब शेख?

चित्रा वाघ यांच्या पतीकडे बेहिशेबी मालमत्ता आहे. वाघ पैसे खातो अन् वाघिणीला देतो. लाचखोर नवऱ्याची बायको, अशी तुमची ओळख असल्याचं शेख म्हणाले होते. तसेच आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्तेचे धडे द्या, नंतर इतरांना शिकवा, अशी टीकाही शेख यांनी केली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com