संकटात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री!

अनिल परब यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार असल्याची घोषणा केली होती.
संकटात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री!
Sarkarnama Banner - 2021-07-24T155135.163.jpg

मुंबई :  महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.  चिपळूणला प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण पडत आहे. यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ Chitra Wagh यांनी चिपळूणचे पालकमंत्री अनिल परब  Anil Parab यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार असल्याची घोषणा केली होती. 

चित्रा वाघ यांनी टि्वट करुन अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ''आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत. एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी अनिल परब हे रात्रीतून मुंबईला पळ काढतात. अशा संकटाच्या काळात जनतेला पाठ  दाखवणारे हे पालकमंत्री कसले ? हे तर पळपुटे मंत्री..'' अशी टिका चित्रा वाघ यांनी टि्वट करुन केली आहे.  

  
कोकणासह मुंबई, मध्यमहाराष्ट्राला दोन दिवसापासून झोडपले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी निशाणा साधला आहे. 

आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: गाडी चालवित पंढरपुरला गेले होते. पण अपघातग्रस्तांकडे मुख्यमंत्र्यांना यायला वेळ नाही, यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टिका होत आहे. याबाबत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली आहे. चित्रा वाघ आपल्या टि्वटमध्ये म्हणतात की, राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का..खरी गरज आता आहे तुमच्या driving कौशल्याची मुख्यमंत्री महोदय.. 

पुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार ? सोमवारी होणार शिक्कामोर्तब 
पुणे :  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट  ३.९ वर आला आहे. पुण्यातील दुकानांची वेळ ५ ऐवजी ७ पर्यंत करा, अशा सूचना आलेल्या आहेत. याबाबतचा सकारात्मक निर्णय सोमवारी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.  
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in