पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील 'त्या' मंत्र्यांची मुख्यमंत्री करणार चौकशी...

भाजपने शिवसेनेचेमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला आहे.
sanjay rathod-pooja chavan.jpg
sanjay rathod-pooja chavan.jpg

पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. 

भाजपने शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन आरोप केला आहे, आता या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्या मंत्र्यांची चैाकशी करणार आहेत. चव्हाण मृत्यूप्रकरणी जी सगळी माहिती पुढे आली आहे तिचा रोख राठोडांकडे असल्याचा आरोप करत पोलिसांनी स्वतःहून राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी केली. एव्हढे पुरावे असतानाही वाट मुख्यमंत्री वाट कशाची बघत आहेत, असा सवाल त्यांनी केला.

एका मंत्र्याशी या मृत्यूचा संबंध जोडला जात असल्याने त्याची चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी या संबंधातील आॅडिओ क्लिप या पोलिस महासंचालकांकडेही दिल्या आहेत. या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव आहे की काय, असा संशय विरोधी पक्षनेते व्यक्त करत आहेत.

टिकटाॅक स्टार पूजा चव्हाण हिच्या मृत्यूच्या कारणांचा तपास पोलिसांनी सुरू केला असून तिचा मृत्य म्हणजे आत्महत्याच आहे, असे नोंदविलेले नाही हे स्पष्ट करण्यात आले. तसेच तिच्या मृत्यूबाबत सोशल मिडियात व्हायरल झालेल्या आॅडिओ क्लिप पोलिसांनाही मिळाल्या आहेत. त्यातील बऱ्याच क्लिप या बंजारा बोलीत असल्याने त्याच्या भाषांतराचे काम पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
 
...तर मलाही आत्महत्या करावी लागेल, असे तो मंत्री का म्हणाला?
  
 परळी येथे राहणारी पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने रविवारी रात्री पुणे येथे आत्महत्या केली. शिवसेनेच्या विदर्भातील एका मंत्र्याची ती प्रेयसी होती, अशी चर्चा त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने राज्यभर पसरली. आता या प्रकरणात आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. या क्लिपमध्ये मंत्री आणि अरुण राठोड नामक इसमाचे संभाषण असल्याचे सांगितले जात आहे. ‘...तर मला आता जीव द्यावा लागेल’, असे संभाषणाच्या शेवटी मंत्री म्हणाल्याचा दावा केला जात आहे.  तसेच या तरुणीचा मोबाईल ताब्यात घ्या, असेही हा मंत्री संबंधिताला सांगत असल्याचे ऐकू येत आहे.

मी स्वतः टेन्शनमध्ये आहे, असेही वाक्य हा मंत्री बोलत असल्याचे ऐकू येत आहे. आधीच घरचे टेन्शन आणि आता हे, असा संवाद आहे. काही बाबी मराठीत तर काही बंजारा बोलीत आहेत.

पूजाच्या आत्महत्येचे गूढ दिवसागणिक वाढत चालले आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनेक तर्क मांडण्यात येत आहे. मंत्र्यासोबतच्या संबंधातून आलेल्या तणावाने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.  मात्र पोलिसांनी त्यास दुजारा दिलेला नाही. सोरायसीस आजारामुळे कंटाळल्याने आत्महत्या केल्याचे तिच्या पालकांनी पोलिसांना सांगितले आहे.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com