मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थिल्लर; सरकार चालवायला दम लागतो : फडणवीसांचा हल्लाबोल 

अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत.
Chief Minister Uddhav Thackeray Thiller; It takes breath to run a government: Fadnavis's attack
Chief Minister Uddhav Thackeray Thiller; It takes breath to run a government: Fadnavis's attack

पंढरपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थिल्लर आहेत. सरकार चालवयाला दम लागतो, तो त्यांच्यात नाही, असा सणसणीत टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. 

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज (ता. 19 ऑक्‍टोबर) सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यात माढा आणि करमाळा तालुक्‍यातील नुकसानीची त्यांनी पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांनी गार अकोला (ता. माढा) येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर हल्लाबोल केला. 

फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना मदतीची गरज आहे, अशा वेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याऐवजी त्यांनी हिम्मत असेल तर शेतकऱ्यांना मदत करावी. केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत, असे सांगून त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारकडे 60 हजार कोटींचा जीएसटी थकल्याच्या आरोपाचे खंडन केले. 

राज्यावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. आणखी 70 हजार कोटी काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे सांगत कर्ज काढा; पण शेतकऱ्यांना मदत करा, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

आम्ही केंद्र सरकारच्या मदतीची वाट न बघता शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली होती. आता केंद्राची वाट का? असा सवाल उपस्थित करत अर्थमंत्री अजित पवार हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप ही त्यांनी केला. 

या वेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह निंबाळकर,आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, चेतन केदार, राजाभाऊ जगदाळे आदी या वेळी उपस्थित होते. 

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे? 

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा महाराष्ट्रातील जबाबदार राजकारणी आहेत. आपल्याला जनतेला दिलासा देण्याचे काम करायचे आहे. केंद्र आणि राज्य सरकार काय करले. यापेक्षा ज्या राज्याचे तुम्ही आहात. बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वतःचे राज्य आज नैसर्गिक आपत्तीत अडकले आहे. राज्याला जर केंद्र सरकारच्या मदतीची गरज आहे, तर सर्वांनी एकवटून केंद्राकडे मागणं मागितले पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. 
 
Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com