पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर उद्धव ठाकरेचं देऊ शकतात...राऊतांनी केलं फडणवीसाचं कैातुक  - Chief Minister Uddhav Thackeray can give Shiv Sena offer to Pankaja Munde  MP Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पंकजा मुंडेंना शिवसेनेची ऑफर उद्धव ठाकरेचं देऊ शकतात...राऊतांनी केलं फडणवीसाचं कैातुक 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

 पंकजा मुंडे यांना जर शिवसेनेत घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’ असं सूचक विधान शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी आज केले.

पुणे  :  ‘भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर शिवसेनेत घ्यायचे असेल तर त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑफर देतील.’ असं सूचक विधान शिवसेनेचे  खासदार संजय राऊत यांनी आज केले.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालापात राऊत बोलत होते. माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक संजय राऊत यांनी केलं. 

एकनाथ खडसे यांच्यानंतर आता पंकजा मुंडे भाजपा सोडणार असल्याच्या राजकीय चर्चा सध्या रंगत आहेत. पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की पंकजा मुंडेंविषयी मला फार माहिती नाही. आमच्याकडून कोणी अशी ऑफर दिलेली नाही. त्यांना अशाप्रकारची ऑफर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं देऊ शकतात.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राऊत म्हणाले, "कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. ध्यानीमनी नसताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तो धक्का अजूनही ते पचवू शकलेले नाहीत. त्यातून बाहेर पडून त्यांनी पुढील राजकारण केलं पाहिजे, फडणवीस राज्याचे नेते असून आम्ही कायम त्यांचा सन्मान केला. ते तरुण आहेत, त्यांचा अनुभव वाढत जाणार आहे. त्यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे. 

राऊत म्हणाले, “आव्हान निर्माण करणं विरोधकांचा अजेंडा आहे. ती आव्हानं आपण राज्यासमोर निर्माण करत आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्या राज्य सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. चांगल्या विरोधकांचं स्वागत करावं या मताचा मी आहे. महाराष्ट्रात विरोधकांची मोठी परंपरा आहे. पण सध्या दुर्दैवाने आपल्या विचाराचे नाहीत त्यांना राजकारण, समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका तयार होताना दिसत असून घातक आहे,” विरोधी पक्ष राहूच नये असं केंद्रातील सरकारला वाटतं. लोकशाहीत उत्तम विरोधी असायला हवेत, त्याशिवाय राज्य पुढे जात नाही. असं संजय राऊत यांनी म्हटलं.

"घंटा बडवल्या, शेंडी-जानवं ठेवलं म्हणजे हिंदुत्व नाही, आमचं राजकीय हिंदुत्व नाही. राजकारणासाठी आजवर कधीच वापर केला नाही. आजही शिवसेना आक्रमकपण हिंदुत्त्वाची भूमिका मांडतं.” असा टोला संजय राऊत यांनी भाजपला यावेळी लगावला. मी अजूनही शिवसैनिक असून, शिवसैनिकाला वय नसतं असंही राऊत म्हणाले. 

संजय राऊत यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कैातुक केलं. ते म्हणाले की शरद पवार हे लोकनेते आहेत. शरद पवार हे प्रेम करणार व्यक्तिमत्व आहे. मागील कित्येक वर्षात लोकांमध्ये जाणारा नेता मी पाहिलेला नाही."राजभवन ही राजकारण करण्याची जागा नाही. त्यांनी बाहेर राजकारण करावे, आम्ही दाखवून देऊ, हे सरकार पडणार नाही आणि त्यांच्यातील बोलणंदेखील बंद झालं नाही. उर्वरित चार वर्ष सरकार पूर्ण करेल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिदू मुंबई होते. आता ते पुणे राहिलं आहे. अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण बाळासाहेबांमुळे मुंबईतून घडत होतं, बदलत होतं. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात
आहेत.  
 संजय राऊत, खासदार
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख