मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार मोदींना फोन.. 'ऑक्सिजनचा पुरवठा करा'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ तासांत तीन वेळा फोन केला.
Sarkarnama Banner (54).jpg
Sarkarnama Banner (54).jpg

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक (Maharashtra coronavirus) वाढला असून ऑक्सिजन तुटवड्यामुळे (Oxygen shortage) राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. राज्यात ऑक्सिजनचा साठाही अत्यंत अपुरा आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २४ तासांत तीन वेळा फोन केला, पण  पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

महाराष्ट्राला तातडीने 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी ते मोदींकडे करणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी ता. 13 एप्रिलला संचारबंदी जाहीर करताना, जनतेशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी ऑक्सिजन तुटवड्याची माहिती दिली होती. हवाई मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा महाराष्ट्राला करावा, अशी विनंती केंद्र सरकारकडे करणार असल्याचे ठाकरेंनी सांगितले होते. 

राज्यातील काही हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमरता भासत असून काही रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत आहे. काल जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सीजन साठा संपल्याने रुग्णांना तातडीने जळगाव येथील गोदावरी मेडिकल कॉलेज येथे हलविण्यात आले. यात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

राज्यात कोरोना रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित रूग्ण आढळत आहेत. मृत्यूमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. काल दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले.  ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.


काल ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  शुक्रवारी देशात तब्बल 2.34 लाख कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे. 

पुणे जिल्ह्यात १०९६३ नवे कोरोना रुग्ण
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १६) दिवसभरात १० हजार ९६३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील १०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ५१ मृत्यू आहेत. काल सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूचा आकडा शंभराहून अधिक झाला आहे. गेल्या वर्षभरात  (गुरुवारी) पहिल्यांदाच जिल्ह्यात एका दिवसातील कोरोना मृत्यूचा आकडा ११४ झाला होता. गुरूवारच्या तुलनेत मृत्यूची संख्या पाचने कमी झाली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यात एका दिवसात
सर्वाधिक ९९ मृत्यू झाले होते.
Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com