संजय राठोडांचा राजीनामा घेण्याची हिमंत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही.. - The Chief Minister does not have the courage to resign from Sanjay Rathod. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : लॉकडाऊनच्या विरोधात साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पोवईनाका येथे पोत्यावर बसून भिक मांगो आंदोलन केले.

संजय राठोडांचा राजीनामा घेण्याची हिमंत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

"ठाकरे सरकार संजय राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत," असा आरोप निलेश राणे यांनी टि्वट करून केला आहे.

मुंबई : "पूजा चव्हाण प्रकरणी भाजप आक्रमक झाला आहे. "याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर आरोप केला आहे. "ठाकरे सरकार संजय राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत," असा आरोप निलेश राणे यांनी टि्वट करून केला आहे.

आपल्या टि्वटमध्ये निलेश राणे म्हणाले, "ठाकरे सरकार संजय राठोड यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सगळ्या बाजूने अडकलेले संजय राठोड शक्तिप्रदर्शन करीत आहेत. कॅबिनेट मिटिंगमध्ये उपस्थित राहत आहेत. पण तरीही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही. परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की 'मी मर्द आहे'

"पूजा चव्हाण प्रकरणात कुणाला वाचविण्याचे आदेश दिले जात आहेत, पोलिस अॅक्शन मोडमध्ये का येत नाही, आदी प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केले आहेत. आज चित्रा वाघ यांनी पूजा राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. "ही शिवशाही आहे की मोगलाही, हे तुमच्या कृतीतून दिसू द्या," असे आवाहन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. 
वानवडी पोलीस निरीक्षक दिपक लगड यांना निलंबित करावं, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, "पूजा चव्हाण प्रकरणात प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सर्व माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी कारवाई का केली नाही, पोलिस कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. संजय राठोड यांना वाचविण्यासाठी हे केले जात आहे. दोन प्रत्यक्षदर्शीना वानवडी पोलिसांनी का सोडलं, वानवडी पोलीस रगेलपणे बोलत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.   
  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहानानंतर भाजपने आपला मोर्चा पुढे ढकलला. पण त्यांच्याच मंत्र्यांने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी गर्दी जमविली. मुख्यमंत्र्यांचे नियम धाब्यावर बसवून या मंत्र्यांनी कोरोना पसरविण्याचे काम केलं आहे. बलात्कारी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारच्या घटक पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे, असा आरोप वाघ यांनी यावेळी केला. 
 
चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिसांवर आरोप केले. या प्रकरणाची चैाकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाघ म्हणाल्या की पोलिस हे रक्षक नसून भक्षक आहेत. या प्रकरणात साधी तक्रारही वानवडी पोलिसांनी दाखल केली नाही, वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लगड यांची भूमिका संशयास्पद आहे. 'आमचा या प्रकरणाशी काही संबध नाही,' अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. या प्रकरणाची चैाकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

या घटनेमागे संजय राठोड आहेत, हे १०० नंबरला कॉल करून सांगण्यात आलं होतं, पण पुणे पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. घटनेच्या दिवशी सकाळी ७ ते ७:३० दरम्यान १०० क्रमाकांवर आलेले कॉल पोलिसांनी जाहीर करावेत. यवतमाळ हॉस्पिटल येथे ज्या डॉक्टरची शिफ्ट नव्हती त्या डॉक्टरने पूजावर ट्रीटमेंट केली. इतके योगायोग कसे असू शकतात का ? असे वाघ म्हणाल्या.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख