दिलासादायक बातमी : अनाथ मुले, ज्येष्ठांची जबाबदारी राज्य सरकार उचलणार - Chief Minister Arvind Kejriwal will provide support to orphans and senior citizens | Politics Marathi News - Sarkarnama

दिलासादायक बातमी : अनाथ मुले, ज्येष्ठांची जबाबदारी राज्य सरकार उचलणार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 मे 2021

अनाथ मुलांच्या शिक्षणाची आणि ज्येष्ठ नागरिकांना मानसिक व आर्थिक आधार देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं उचलली आहे.

नवी दिल्ली  : कोरोनाच्या संकटात अनेकाचा जीव गेला, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत, अशा भीषण परिस्थितीत अनेक मुलांच्या माता-पिताचे छत्र हिरावलं गेलं. तर काही ज्येष्ठांनी आपली तरुण मुले गमावली. अशा अनाथ मुलांच्या शिक्षणाची आणि ज्येष्ठ नागरिकांना मानसिक व आर्थिक आधार देण्याची जबाबदारी राज्य सरकारनं उचलली आहे. Chief Minister Arvind Kejriwal will provide support to orphans and senior citizens

राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर संपलेला नाही, अशा परिस्थितीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या अनाथ मुलांची आणि ज्य़ेष्ठांची जबाबदारी उचलली आहे. ''हे काम आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये पूर्ण करू,'' असा विश्वास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.

अभिनेते अनुपम खेर यांचा "युटर्न"... मोदींविषयी म्हणाले...

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णसंख्या आणि संसर्गाचा दर हे गेल्या दोन दिवसांत झपाट्याने कमी होत आहे त्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच केजरीवाल यांनी लढाई अजून संपलेली नाही, असे सांगितले. नवीन रुग्णसंख्या काहीशी घटली, हे मी जाहीर करतो मात्र त्याचा अर्थ आरोग्य नियमांचे पालन करणे सोडून द्यायचे असा नव्हे. संसर्गाचा दर आपल्याला शून्य टक्क्यावर न्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या संसर्गामध्ये ज्यांच्या घरातील कमावती व्यक्ती मरण पावली आहे, अशा कुटुंबांना देखील राज्य सरकार आर्थिक मदत करेल, असेही केजरीवाल यांनी जाहीर केले. ज्या मुलांनी आपले आई-वडील गमावलेत अशांनी स्वतःला अनाथ समजू नये. सरकार आणि मी व्यक्तिशः त्यांच्या मागे उभा आहे. या सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि संगोपनाचा खर्चही सरकार उचलेल असे त्यांनी जाहीर केले. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांची मुले गमावली त्यांचा केजरीवाल नावाचा मुलगा अजून जिवंत आहे, असे भावुक उद्गार काढत मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दिल्लीमध्ये संसर्गाचा दर बारा टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. मागील चोवीस तासांत ही रुग्णसंख्या ८ हजार ५०० पर्यंत कमी झाली आहे. त्याचप्रमाणे मागच्या दहा दिवसांमध्ये कोरोना रुग्णांसाठीचे तीन हजार बेड रिकामे झालेले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. अतिदक्षता विभागातील सर्व बेड अजूनही भरलेले असल्याने धोका कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख