भुजबळ यांची पाच मजली इमारत प्राप्तिकर खात्याकडून जप्त

छगन भुजबळ यांचा पुतण्या समीरयाच्या मालकीची मरीन ड्राईव्हवरील पाच मजली इमारत प्राप्तिकर खात्याने जप्त केली.
भुजबळ यांची पाच मजली इमारत प्राप्तिकर खात्याकडून जप्त
1Sameer_20Bhujbal_20F.jpg

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भूजबळ यांच्या इमारतीवर प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. ही इमारत छगन भुजबळ, पंकज भूजबळ यांच्या मालकीचे असल्याचे समजते. ईडी, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करीत असतानाच आता ही वेगळी कारवाई झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणती वळण घेईल, याबाबतही तर्कवितर्क केले जात आहेत.

अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांचा पुतण्या समीर Sameer Bhujbal याच्या मालकीची मरीन ड्राईव्हवरील पाच मजली इमारत प्राप्तिकर खात्याने जप्त केली. सुमारे शंभर कोटी रुपये किंमत असलेली ही इमारत बेनामी असल्याने कारवाई करण्यात आली. ही कारवाई करून प्राप्तिकर खात्याने प्रत्यक्षात छगन भुजबळ यांनाच हादरा दिल्याचे मानले जात आहे. मुळात ही मालमत्ता समीर भुजबळ यांना कशी मिळाली, असेही विचारले जात आहे. ईडी, सीबीआय आदी केंद्रीय तपास यंत्रणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना लक्ष्य करीत असतानाच आता ही वेगळी कारवाई झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणती वळण घेईल, याबाबतही तर्कवितर्क केले जात आहेत.

अखेर नारायण राणे यांचा जामीन मंजूर
मरीन ड्राईव्ह परिसरातील अल जब्रिया ही इमारत कुवेतच्या शेख राजघराण्याच्या कुटुंबाच्या मालकीची होती. त्याच्या खरेदीचा व्यवहार करण्यासाठी २०१३ मध्ये समीर भुजबळ एका उद्योजकासह कुवेतला गेला होता. बावीस कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी ही इमारत समीर यास विकण्यात आली. तरीही सरकारी कागदपत्रांमध्ये यावर कोणाचेही नाव लावण्यात आली नाही. त्यामुळे ही मालमत्ता बेनामी ठरवून जप्त केली. विक्रीची किंमत हवाला व्यवहारांमधून राजघराण्याला पोहोचविण्यात आली, असा तपास यंत्रणांना संशय असून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.

फडणवीस-पाटील यांच्या गळ्यात राणे नावाचा फाटका फुगा अडकला 
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना काल पोलिसांनी अटक केली, रात्री उशीरा त्यांना जामीन मंजूर झाला. काल भाजप-शिवसेना यांच्यात राडा झाला. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपवर निशाणा साधला आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.