झारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर - Chandrashekhar Bawankule tried to topple Kandahar Govt | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

भाजपचे किरीट सोमय्या अखेर महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना
चरणजीत चन्नी होणार पंजाबचे नवे मुख्यमंत्री राज्याचे प्रभारी हरीश रावत यांची घोषणा
गणेशोत्सव विसर्जनामुळे पुण्यात मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद
अंबिका सोनी यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद नाकारले
पुरग्रस्तांसाठी सरकारची महत्वाची घोषणा ; नव्या निकषानुसार मदत

झारखंड सरकार पाडण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे गेले होते... 50 कोटी आणि मंत्रीपदाची होती आॅफर

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 26 जुलै 2021

मलिक यांचा खळबळजनक आरोप

मुंबई : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून महाराष्ट्रातील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawnkule) हे तेथील काॅंग्रेसचे आमदार फोडण्यासाठी गेले होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना केला. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काॅंग्रेस यांचे आघाडी सरकार आहे. 

महाराष्ट्रात पूरस्थिती असताना झारखंड सरकार पाडण्याचा डाव केंद्र सरकार करत आहे. भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आमदार फोडण्यासाठी गेले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये चंद्रशेखर बावनकुळे, मोहित कंबोज यांची नावे आली आहेत. झारखंड पोलिस महाराष्ट्रात तपास करायला येणार आहेत. या तपासासाठी महाराष्ट्र सरकार हे झारखंड पोलिसांना सर्वपरीने मदत करेल. कर्नाटकमधील कुमारस्वामी यांचे सरकार पाडताना महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा सहभाग पाहायला मिळाला होता.
झारखंड सरकार पडतांना भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे, हे स्पष्ट होते. अभिषेक दुबे यांनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये भाजपच्या दोन आमदारांचे नाव आहे. हे कोण आमदार आहेत हे झारखंड पोलिस तपास करणार आहेत, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होऊ शकत नाही. मात्र अन्य राज्यात कर्नाटकप्रमाणे ऑपरेशन लोटस सुरू आहे. 50 कोटी रुपये आणि मंत्रीपद अशी झारखंडमधील काँग्रेस आमदारांना ऑफर होती, असा दावा मलिक यांनी केला. बावनकुळे हे तेथे एका मद्य व्यापाऱ्याला भेटले. कोणत्या हाॅटेलमध्ये काॅंग्रेस आमदारांची बावनकुळे यांची भेट झाली, तेथे कोण होते, याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे मलिक यांनी सांगितले. या साऱ्या प्रकाराच्या तपासातून आणखी काही गोष्टी पुढे येतील. बावनकुळे हे महाराष्ट्रात भाजपचे सरकार असतात उत्पादनशुल्क मंत्री होते. याचा काही त्या दारू व्यापाऱ्याशी काही संबंध आहे का, हे पण तपासात कळेल. महाराष्ट्रातील इतर कोण आमदार यात सहभागी होते, यावरही तपासानंतर प्रकाश पडेल. 

महाराष्ट्रातील पूरस्थितीत भाजप खेळत असलेल्य राजकारणाबाबत मलिक यांनी नाराजी व्यक्त केली.  १३ जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. ९५१ लोकांना आपला जीव गमवावा लागला. १०० पेक्षा अधिकजण बेपत्ता आहेत. मुख्यमंत्री गेले तीन दिवस या भागाच्या दौ ऱ्यावर आहेत.  सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन मदत करायला हवी. केंद्राकडून मदत केली जात आहे. भाजपचे काही नेते मात्र उलटसुलट बोलत आहेत. भाजपचे नेते हे मंत्री, मुख्यमंत्री यांच्यावर टीका करतात, हे बरोबर नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुलगा मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावर बोलत आहे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे.
सत्तेसाठी भाजप कुठल्याही टोकाला जात आहे.  सरकार चुकत असेल तर सल्ला द्यायला हवा. टीका नाही, अशी अपेक्षा मलिक यांनी केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख