देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही कर्तृत्ववान, परखड नेते : चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil wishes happy birthday by Ajit Pawar and Devendra Fadnavis-arj90 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही कर्तृत्ववान, परखड नेते : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 जुलै 2021

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मास्क वापरायला लावून, पुरेशी काळजी घेऊन बाहेर पडायला परवानगी द्यावी

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आज (ता.२२ जुलै) वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देतांना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही तर्तूत्ववान आणि परखड नेते आहेत. त्यांना दोघांनाही शुभेच्छा. (Chandrakant Patil wishes happy birthday by Ajit Pawar and Devendra Fadnavis)

हेही वाचा :  देखमुखांनी भाजपसाठी जे केले: ते भरणे राष्ट्रवादीसाठी करुन दाखवतील काय?

पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणले की ''न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून मंदिरे कमी संख्येने, पुरेशी काळजी घेऊन खुली करावीत. दुसऱ्या कोरोनाच्या लाटेमध्ये देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे केंद्र सरकारने लोकसभेत सांगितले. त्या विषयी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ऑक्सिजन कमतरतेमुळे मृत्यू झाले नाहीत. याबाबत डाटा उपलब्ध नाही राज्य सरकारनेच या प्रकरणाची चौकशी करावी. 

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना मास्क वापरायला लावून, पुरेशी काळजी घेऊन बाहेर पडायला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. चिपळूणमध्ये ढगफूटी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी मदत करण्यासाठी इतर टीम मार्गस्थ होत आहेत. सर्व लोक सुखरूप करता येतील याचा प्रयत्न सुरू. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना लगेचच जायला सांगणार असल्याचे यांनी सांगितले. 

हेही वाचा : यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सहकाराबाबत केंद्र सरकारला झटका, दणका असे काही नाही. पिगॅसस या हेरगिरी करणाऱ्या तंत्रज्ञानाव्दारे देशातील अनेक नेत्यांचे टॅपिंगचे करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ होत आहे. त्या विषयी विचारले असता पाटील म्हणाले, खत कंपन्यांवर पाळत ठेवण्यासाठी पेगॅसीसचा वापर करण्यात आला. माहिती जनसंपर्क खात्याच्या अधिकाऱ्यांचा इस्राईल दौरा किंवा फोन टॅपिंगचे आरोप याची पोलखोल व्हावी, यासाठी समिती नेमा दूध का दूध पानी का पानी होऊ द्या, असेही पाटील म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख