मुंबई : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात भाजपला अपयश आले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं भाजपचा धुव्वा उडवला. या निकालाबाबत भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, "मी त्यांना चॅलेंज देतो हिंमत असेल तर एकटे एकटे लढा. शिवसेना सोबत असती तर बळ मिळलच असतं.पण ते सोबत नाही. त्यांनी आता रंग बदलला आहे. ते सध्या राष्ट्रवादीसोबत आहेत."
चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपाला निवडून द्यायच नाही, हा एकच झेंडा महाविकास आघाडीचा आहे. प्रत्येक पक्षाची वोट बॅक असते. आमचा मित्र पक्ष (शिवसेना) त्यांना जाऊन मिळाला म्हणून हे चित्र पाहायला मिळालं आहे. शिवसेनेला या निवडणुकीत भोपळा मिळाला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून त्यांना उमेदवार निवडता येत नाही
." "मी विनोदी विधान करतो अस शरद पवार बोलतात त्यांना बोलू द्या.शक्यतो ते खालच्या पातळीची वक्तव्य कधीही करत नाही," असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील भाजपला निकालातून सूचक इशारा#NCP #Congress #Shivsena #Pune #BJP #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/pRaEE34BuW
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 4, 2020
विधान परिषद निकालानंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीने यश मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की धुळे नंदुरबार मतदारसंघातील निर्णय हा आश्चर्यकारण नाही, त्याच्या हाती मोठा वर्ग होता. हा त्याचा विजय नव्हे
. गेल्या वर्षभरात काम करून दाखवलं, यामध्ये मुख्यतः नागरपूची जागा कधीच मिळाली नव्हती, ती जागा कॉग्रेसने जिंकली आहे.
शरद पवार म्हणाले, "महाराष्ट्रातील निकाल हा महाविकास आघाडीचा विजय आहे. महाविकास आघाडी सरकारने एकत्र काम केलं त्याचं हे यश आहे. पुणे मतदारसंघतही आम्हाला यश मिळवता आलं नव्हतं, मात्र आता सर्वसामान्य लोकांनीही महाविकास आघाडी सरकारला स्वीकारलं आहे, महाराष्ट्रतील चित्र बदलते आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांचा विनोदी विधान करण्याचा लौकिक आहे, मागच्या वेळेस विधानपरिषदेला चंद्रकांतदादा कसे निवडून आले. पुणे शहरातील त्याच्या सोयीचा मतदारसंघ त्यांनी निवडला."
सत्तेत राहण्यासाठीचे गणित आम्ही वर्षापूर्वीच जुळवले : अनिल देशमुख
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निकाल लागत आहेत. महाविकास आघाडीने बहुतांश ठिकाणी आघाडीवर आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव निश्चित केला. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली. देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टि्वट करून महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

