उद्धव ठाकरेंनी दोन थोबाडीत मारल्या तरी आम्ही सत्ता सोडणार नाही

शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत.
 Chandrakant Patil, Uddhav Thackeray .jpg
Chandrakant Patil, Uddhav Thackeray .jpg

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे त्यांना मंगळवारी अटक झाली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राणे यांच्या अटकेवरुन शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक ठिकाणी वाद झाला. त्या पाश्वभूमिवर भाजपचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी साम टीव्हीला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी भाजप-शिवसेना युतीबात मोठे विधान केले. (Chandrakant Patil said about BJP Shiv Sena alliance) 

चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवसेनेची नुकतीच बैठक झाली. अशी बैठक झाली हे शिवसेना मान्य करणार नाही. शिवसेनेने भाजपसोबत जाऊ नये, यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत. असेही पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन थोबाडीत मारल्या तरी आम्ही सत्ता सोडणार नाही. असे काँग्रेसचा एक मंत्री मला म्हणाला, असे पाटील यांनी सांगितले.

शिवसेना-भाजप नात्यावर पाटील म्हणले, कितीही मारामाऱ्या झाल्या तरी सख्खा भाऊ सख्खा भाऊच राहतो. त्यांचे रक्त एकच. भांडणे इतकी झाली की एकमेकांकडे पाहण्याची इच्छा नाही. एकमेकांना बघायचे नाही इतके वितुष्ट आले. पण सख्खे भाऊ सख्खे भाऊच असतात. चांगले संबंध असणे हे शेाऱ्याला पटत नाही. शेजाऱ्याला मग तो सतत म्हणतो लफडे आहे. त्यात मग ते वेगळे होतात २०१९ मध्ये हेच घडले. सगळे काँग्रेस-राष्ट्रवादीवाले फाईव्ह स्टार हॅाटेलमधून मजा बघत होते, असा टोला पाटील यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लगावला आहे.  

भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंब झाले आहे. त्या विषयी विचारले असता पाटील म्हणाले, विधानसभेत गोंधळ होऊ नये म्हणून मी वैयक्तिक भास्कर जाधवांशी बोललो. त्यांना मी सांगितले की विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू द्या. तसे ते गेलेही. मात्र, नंतर जे झाले ते आपण पाहिले. बारा आमदारांच्या निलंबनाची उद्धव ठाकरेंची इच्छा नव्हती. काँग्रेसही आग्रही नव्हती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमुळे निलंबन झाले, असेही पाटील यांनी सांगितले. 

  
Edited By - Amol Jaybhaye 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com