राणेंच्या अटकेनंतर अनिल परब अडचणीत; आता भाजपच्या टार्गेटवर  

एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे. राणेंचे वाक्य चुकले नाही.
 Anil Parab .jpg
Anil Parab .jpg

मुंबई : जनआशीर्वाद यात्रा घेऊन संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे आलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी तेथेच अटक करण्यात आली. सुमारे दीड तासाहून अधिक काळ हे अटक नाट्य रंगले होते. वॉरंटशिवाय नारायण राणेंना अटक करण्याच्या नाट्याचे खरे सूत्रधार परिवहन मंत्री अनिल परबच (Anil Parab) आहेत, या संदर्भात एक क्लिपही व्हायरल झाली आहे. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी परब यांच्यावर टीका केली आहे. (Chandrakant Patil criticizes Anil Parab) 

चंद्रकांत पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, लवकरच अनिल परब यांच्या विरोधात याचिका दाखल केली जाईल. सगळी याचिका तयार करण्यात आली आहे. परब यांची सगळी क्लिप राज्याने पाहिली आहे. त्यामुळे अनिल परब अडणचीत येणार असल्यीची शक्यता वर्तवली जात आहे.   

यावेळी पाटील म्हणले, ''एखादी गोष्ट चुकली तर राणेंना आणि त्यांच्या मुलांना सांगण्यासाठी व्यवस्था आहे. राणेंचे वाक्य चुकले नाही. थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद असतो. भाजप मनामध्ये खुन्नस ठेऊन काम करीत नाही. राऊत साहेब तुमच्यावर पण आरोप झालेत, त्यावर पण बघा. पोलिसांच्या बळावर आणि गुंडांच्या बळावर हे राज्य चाललंय. फुग्याला भोक तुमच्या पडले आहे, मी 'सामना'ला किंमत देत नाही, असे पाटील यांनी सांगितले.

''काल दिवसभरात झालेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झाला हे सिद्ध झाले आहे. आता राणेंना जामीन मिळाला आहे.  सत्याचा विजय झाला आहे.  सरकार सारखे कोर्टाच्या थपडा खात आहे. काल राणे जेवत असताना ताट हिसकावून घेत त्यांना अटक केली. हा प्रकार अमानवी आहे. राणेंची तब्बेत खराब झाली आहे. त्यामुळे एक दिवस ते आराम करणार असून लवकरच जन आशीर्वाद यात्रा निघेल,'' असे पाटील यांनी सांगितले.  

प्रकरण काय?

वॉरंटशिवाय अटक करण्याच्या पोलिस कारवाईवर नारायण राणे यांनी आक्षेप घेतल्यामुळे रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक गर्ग यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी परब हे डीपीडीसीच्या बैठकीत होते, त्यांच्या शेजारी आमदार भास्कर जाधव आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बसले होते. पोलिस अधीक्षकांशी परब यांची चर्चा सुरू असतानाच जाधव यांनी ‘राणे यांचा जामीन अर्ज सत्र व उच्च न्यायालयाने फेटाळला आहे,’ असे परब यांना सांगितले. राणेंनी अटक वॉरंटची मागणी केल्याचे अधीक्षकांनी सांगितल्यानंतर परब म्हणाले की, ‘न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही. तुम्ही पोलिस फोर्स वापरून अटकेची कारवाई करा.’ 

त्याच वेळी त्यांनी राणे हे घरात बसले आहेत, पोलिस त्यांना ओढून बाहेर काढत आहेत. पण, राणे (फोनवर नाव न घेता) त्याला विरोध करत आहेत, असेही त्यांनी शेजारी बसलेल्या सामंत आणि जाधवांना सांगितले. संभाषण संपल्यानंतर पत्रकारांनी त्यांना राणेंच्या अटकेबाबत विचारले असते, ‘त्याबाबत मला काही माहिती नाही. गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाला आहे. मी तर रत्नागिरीत बसलो आहे, चला, असे सांगून ते निघून गेले.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com