केंद्र सरकार महाराष्ट्राला लस कमी का देत आहेत..संजय राऊतांचा सवाल - central government giving less vaccines to Maharashtra Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

केंद्र सरकार महाराष्ट्राला लस कमी का देत आहेत..संजय राऊतांचा सवाल

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 एप्रिल 2021

केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

मुंबई : महाराष्ट्राला अधिक आरोग्य सुविधा मिळावयात ही आमची मागणी आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवरची गरज 80 हजाराची आहे. राज्यांना ऑक्सिजन बाबत उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करायला लागतो, हे केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावे. केंद्र सरकार महाराष्ट्राला लस कमी का देत आहेत, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

राऊत म्हणाले की, राज्यातील ऑक्सिजन बाबत उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करायला लागतो हे केंद्र सरकारने गांभीर्याने घ्यावे. केंद्र सरकारने ते किती ऑक्सिजन प्लँट तयार करत आहेत हे सांगावे, देशभरात अनेक राज्यात कोरोना टेस्ट होत नाही, त्यामुळे कोरोनाचा आकडा कमी आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन खूप गंभीर आहे. महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्र्यांनी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काल टीका केली होती. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या उदासिनतेमुळे देशात कोरोनाचे फैलाव वेगाने होत आहे. कोरोनाला रोखणे हे महत्वाचे आहे. यावरून राजकारण करू नये. माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत जो सल्ला व सूचना दिल्या आहेत. त्याची मोदींनी अंमलबजावणी करावी.  मोदी हे निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. त्यांना विरोधी पक्षासोबत बोलण्यास वेळ नाही.

प्रियंका यांच्या विधानावर संजय राऊत म्हणाले, ''प्रियांका गांधी यांनी देश के मन की बात की है..'' भाजप नेते राज्यातील आघाडीचे सरकार पाडण्याबाबत नेहमी बोलत असतात, यावर राऊत म्हणाले की,ओझं कधी वाढत ते बघू आम्ही... ओझं वाढलं की त्यांना कळवू.

'गुजरातमध्ये मोफत रेमडेसीवर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवर कसे मिळते हा गंभीर प्रश्न आहे. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचा पैसा तत्काळ द्यावा,' असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख