मेहुल चोकसीच्या मुसक्या आवळणार महाराष्ट्रातील ही लेडी सिंघम.. - cbi team led by ips officer sharda raut to bring back mehul choksi from dominica if he deported | Politics Marathi News - Sarkarnama

मेहुल चोकसीच्या मुसक्या आवळणार महाराष्ट्रातील ही लेडी सिंघम..

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 2 जून 2021

शारदा राऊत या महाराष्ट्राच्या २००५ च्या आयपीएस अधिकारी आहेत. 

नवी दिल्ली :  पंजाब नॅशनल बॅंक गैरव्यवहारातील आरोपी, हिऱ्यांच्या व्यापारी मेहुल चोकसी यांच्या भारत प्रत्यार्पणासाठी आज डोमिनिका येथे सुनावणी होत आहे. मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणाचा निर्णय झाला तर त्याला भारतात आणण्याची जबाबदारी सीबीआयकडे आहे. सीबीआयच्या सहा अधिकाऱ्यांचे पथक डोमिनिका येथे गेले आहे. या पथकाचे नेतृत्व शारदा राऊत या करीत आहेत. शारदा राऊत या महाराष्ट्राच्या २००५ च्या आयपीएस अधिकारी आहेत. cbi team led by ips officer sharda raut to bring back mehul choksi from dominica if he deported

पंजाब नॅशनल बॅक गैरव्यवहाराच्या तपासात शारदा राऊत यांची महत्वाची भूमिका आहे. मेहुल चोकसीच्या प्रत्यार्पणासाठी त्या डोमिनिका येथे गेल्या आहेत. चोकसीच्या प्रत्यार्पणाचा निर्णय झाला तर त्याला प्रायव्हेट जेटव्दारे नवी दिल्लीत आणण्यात येणार आहे. चोकसीला भारतात आणण्यासाठी या सीबीआयच्या पथकाने अनेक वेळा डोमिनिका प्रशासनासोबत बैठक घेऊन चर्चा केली आहे. 

एक दिवस फडणवीस "मातोश्री"वरही येतील...

आज डोमिनिकाच्या न्यायालयात मेहुलच्या विरोधात ईडीनं सादर केलेले दोषारोपपत्र सादर करण्यात येणार आहे. या दस्ताऐवजाच्या आधारे तो भारताचा नागरिक आहे, म्हणून त्याचे प्रत्यार्पण करावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात येणार आहे. "आपल्या ताब्यातील व्यक्ती मेहुल चोकसी ही जानेवारी २००८ पासून भारतातून पळून गेली आहे.  त्याचे प्रत्यार्पण लवकर करावे," अशी मागणी ईडी आणि सीबीआय आज न्यायालयात करणार आहे. 
 
शारदा राऊत या महाराष्ट्रातील डॅशींग पोलीस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झाला आहे. त्या 2005 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. पालघर, नागपूर, मीरा रोड, नंदुरबार, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) बॅँकींग फ्रॉड विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. सीबीआयच्या मुंबई कार्यालयाच्या बॅँकींग फ्रॉड विभागाच्या त्या प्रमुख म्हणून काम करतात. पोलीस महानिरिक्षक (डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल- डीआयजी) या पदावर सध्या त्या कार्यरत आहेत.

सध्या मेहुल हा डॅामिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. तो कारागृहात असल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी सांगितले की चोकसीला दक्षिण डॅामिनिका येथून पकडण्यात आले. या ठिकाणी एकही विमानतळ नाही, चोकशी हा या ठिकाणी बोटीतून आला असावा. त्याला कैनफील्ड येथील किनाऱ्यावर पकडण्यात आले.  ज्यावेळी मेहुल चोकसीला पकडण्यात आले तेव्हा तो समुद्रात महत्वाची कागदपत्रे नष्ट करीत होता. हे डॅामिनिका पोलिसांनी पाहिले असता, त्यांना संशय आला. पोलिसांनी यांनी त्याला याबाबत विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मेहुल चोकसी या बोटीतून डॅामिनिका येथे आला होता. तेथून तो क्यूबा येथे पळून जाण्याच्या बेतात होता, असे चैाकशीत आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.  
Edited by : Mangesh Mahale   

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख