Sarkarnama Exclusive : एका कॅबिनेट मंत्र्याला सीबीआय चौकशीसाठी बोलविणार... - CBI may summon cabinet minister in Sushantsingh death case | Politics Marathi News - Sarkarnama

Sarkarnama Exclusive : एका कॅबिनेट मंत्र्याला सीबीआय चौकशीसाठी बोलविणार...

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

सीबीआय या केसचे विविध कंगोरे उघडण्याच्या तयारीत 

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतल्यापासून अनेक वेगळी वळणे त्यास लागली आहेत. अमली पदार्थाच्या तस्करीचा दुसरा कोन या तपासात उघड झाला. या प्रकरणाला राजकीय वळण लागण्याची शक्यताही आधीपासूनच व्यक्त करण्यात येत होती. त्यानुसार महाविकास अघाडीतील एका कॅबिनेट मंत्र्याला सीबीआय चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.

सुशांतसिंह केसप्रकरणी या मंत्र्यांकडे अधिक काही माहिती आहे का, याची खातरजमा करण्यासाठी या मंत्र्याला सीबीआय पाचारण करण्याच्या तयारीत सीबीआय आहे. हा मंत्री शिवसेनेचा असून त्याला खरोखरीच बोलविले तर या प्रकरणामुळे रंगलेले भाजप विरुद्ध शिवसेना असे राजकीय युद्ध पुन्हा पेटू शकते.

या मंत्र्याने `कोरोनाच्या कडक लाॅकडाऊन काळात सुशांतसिंह याच्या घरी पार्टी कशी झाली व त्या पार्टीला कोणकोण उपस्थित होते. याची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी आणि या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असे ट्विट केले होते.

सीबीआयच्या विनंतीनंतर मुंबई पोलिसांचे पाऊल... #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #PoliticalNews #SushantSinghRajput #RheaChakroborty #MumbaiPolice #NCB #ED #CBI #Bollywood #Viral #viralnews

Posted by Sarkarnama on Saturday, August 29, 2020

या ट्विटवरून या मंत्र्यांची चौकशी सीबीआय करणार असल्याचे समजते. या पार्टीबद्दल या मंत्र्यांकडे अधिक काही माहीत आहे का, हे सीबीआयला जाणून घ्यायचे आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनीही या सुशांतसिंहच्या मृत्यबाबत काही दावे केले होते. सीबीआयने माहिती मागितली तर आम्ही ती देऊ असेही जाहीर केले होते. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना सीबीआय बोलविणार की नाही, याचीही उत्सुकता आहे. मात्र शिवसेनेच्या नेत्याला बोलाविल्यानंतर राजकीय खळबळ उडू शकते. हे प्रकरण गेले काही दिवस राजकीय वळण घेत असल्याने साहजिकच या संभाव्य चौकशीचा राजकीय धुरळा आणखी उडण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सुशांतसिंह प्रकरणात दोन-तीन पार्ट्यांचा उल्लेख काही नेत्यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अभिनेता दिनो मोरिया याच्या घरी पार्टी झाल्याचे एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. या पार्टीला कोणकोण उपस्थित होते, याची माहिती पोलिसांनी घ्यावी, अशीही सूचना त्यांनी केली होती. यावर सीबीआय प्रकाश टाकणार की नाही हे अद्याप समजू शकले नाही.

दुसरीकडे माजी आमदार अनिल गोटे यांनीही याबाबत भाजप नेत्यांना लक्ष्य करण्याचे धोरण ठेवले आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी व अन्य भाजप नेत्यांच्या विरुद्ध सुशांतसिंग केसमध्ये पुरावा लपवुन ठेवून तपासाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर पत्र लिहून केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख