भाजपचे आमदार पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल 

शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3Gopichand_20Padalkar_3.jpg
3Gopichand_20Padalkar_3.jpg

जेजुरी (पुणे)  : जेजुरी देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नियोजित आहे. मात्र, त्यापूर्वीच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पहाटे या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.  याप्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याप्रकरणी पडळकर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. आज पहाटे साडेपाच वाजता गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला होता.  यावेळी त्यांनी पवार यांच्यावर गंभीर आरोपही केले.
 

आज पहाटे पडळकर काही कार्यकर्त्यांसमवेत जेजुरी गडावर पोहोचले. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांनी पुतळ्या भोवती फुलांची सजावट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला. पडळकर यांनी यावेळी पवार यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पोलिसांनी अनावरण करण्यापासून पडळकर यांना रोखले. त्यावेळी कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. 

पडळकर यांनी यापूर्वीही असे स्टंट केले आहेत. पवार यांच्याबाबत यापूर्वीही त्यांनी अनुचित उद्गार काढले होते. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. पडळकर यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचे डिपाॅझिट जप्त झाले होते. पडळकर यांनी आमदार झाल्यापासून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका करण्याचे सत्र आरंभले.

गेल्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विधान परिषद निवडणूक जाहीर झाली. भाजपने आश्चर्यकारकरित्या गोपीचंद पडळकरांना उमेदवारी दिली. या उमेदवारीमुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात वादंग माजले. पडळकरांचे बारामतीत डिपॉझिट होवूनही त्यांना आमदार केले गेल्याचा मुद्दा विशेष चर्चिला गेला. ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या मार्गावर असताना पडळकरांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींवर टीका केली होती.

आज पडळकर जेजुरीत अचानक आले. त्यांनी पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जेजुरीत तणाव निर्माण झाला. पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी या कथित अनावरणानंतर फटाक्यांची आतषबाजीही केली. या एकूण प्रकारामुळे स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com