Sarkarnama Banner - 2021-08-03T083535.569.jpg
Sarkarnama Banner - 2021-08-03T083535.569.jpg

माजी मंत्री सहाव्या निकाहाच्या तयारीत ; तिसऱ्या पत्नीची पोलिस ठाण्यात धाव

त्पांचा पहिला निकाह समाजवादी पक्षाच्या नेत्या गजाला यांच्याशी केला होता.

आग्रा : उत्तर प्रदेश सरकारमधील  Uttar Pradesh माजी मंत्री सहाव्या लग्नाच्या तयारी करीत असल्याने चर्चेत आले आहेत. त्यांच्या सहाव्या निकाहची माहिती समजल्यावर त्यांच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. या माजी मंत्र्याच्या विरोधात  मुस्लिम महिला संरक्षण कायद्याच्या कलम 3/4 आणि भादंवि कलम 504 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  बशीर यांनी दिल्लीच्या रुबिनाशी दुसरा आणि मंटोलाच्या नगमाशी तिसरा निकाह केला. आता ते सहाव्यांदा निकाह करण्याची तयारी करत आहेत.

बशीर चौधरी Bashir Chaidhary असे या माजी मंत्र्याचे नाव असून ते उत्तर प्रदेश सरकारमधील माजी मंत्री आहेत. या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांची तिसरी पत्नी नगमा यांनी त्यांच्याविरोधात तिहेरी तलाकचा गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी शारिरीक छळ प्रकरणात बशीर चैाधरी यांना तुरुंगात जावे लागले आहे. आता आग्रा येथील मंटोला पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

MPSC : अजितदादांनी शब्द पाळला!
तीन वर्ष माहेरी असलेल्या त्यांच्या पती नगमा यांनी त्यांच्यावर आरोप केला आहे की, त्यांनी तीन तलाक पद्धतीनुसार घरातून बाहेर काढले आहे. माजी मंत्र्याची पत्नी नगमा यांचा एक व्हिडिओ मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात त्यांनी पतीवर मानसिक आणि शारीरिक छळाचे आरोप केले आहेत. माजी मंत्री चौधरी बशीर यांनी पहिला निकाह समाजवादी पक्षाच्या नेत्या गजाला यांच्याशी केला होता. 
 
आपद्‌ग्रस्तांना पालकमंत्री परबांनी दिलेले मदतीचे धनादेश परत घेतले
नगमा या ताजगंज परिसरात राहतात. त्यांचा निकाह 11 नोव्हेंबर 2012 रोजी माजी मंत्री चौधरी बशीर यांच्याशी झाले होते. त्यांना दोन मुलेही आहेत.नगमा यांचा आरोप आहे की, लग्नापासून त्यांचा पती आणि सासरचे लोक त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. पती आणि  त्याचा परिवारांने आपला शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप नगमा यांनी केला आहे. त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींकडून बशीर चैाधरी हे सहावा निकाह करणार असल्याचे त्यांना समजते होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. 
 Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com