'एमपीएससी'ची रविवारी होणारी परीक्षा रद्द करा; अन्यथा गनिमी कावा करू 

स्थगिती उठली नाही तर अनेक विद्यार्थी वयाच्या अटीवर आपोआप बाद होतील.
Cancel MPSC exam on Sunday; otherwise we will do ganimi kawa: Maratha Kranti Morcha
Cancel MPSC exam on Sunday; otherwise we will do ganimi kawa: Maratha Kranti Morcha

पुणे : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात; अन्यथा येत्या रविवारी होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत गनिमी कावा ठरलेला आहे, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुन्हा देण्यात आला आहे. 

रविवारी होणाऱ्या परीक्षांचा निकाल सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतर जाहीर करणार, असे आयोगाने जाहीर केले आहे. याचा अर्थ स्थगिती उठली नाही तर अनेक विद्यार्थी वयाच्या अटीवर आपोआप बाद होतील, त्यामुळे आयोगाने व राज्य सरकारने यात स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे रविवारी होणाऱ्या परीक्षेत गनिमी कावा करण्याचा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे. मोर्चाच्या वतीने बुधवारी नवी मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्यात "एमपीएससी'च्या परीक्षेला 2 लाख 61 हजार विद्यार्थी बसणार आहेत. या पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा, त्यानंतर मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया होण्यास काही कालावधी लागणार आहे. रविवारी होणारी पूर्व परीक्षा कोरोनाचे कारण सांगून या पूर्वी पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर मराठा आरक्षणावर अंतरीम स्थगिती आली. 

परीक्षेचे अर्ज भरताना "एसईबीसी' प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वयाची सवलत 43 वर्षे आहे. आरक्षण स्थगितीमुळे खुल्या प्रवर्गाच्या वयाची 38 ही अट लागू झाली. 38 ते 43 व "पीएसआय'साठी 31 ते 34 या वयाची मर्यादा कमी झाल्याने मराठा समाजातील अनेक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात बाद होतील. ता. 7 एप्रिल 2020 रोजी कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

कोविडची महामारी आजही कमी झालेली नसताना तसेच सर्व शासकीय कार्यालयात कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती फक्त 50 टक्के असताना आता परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी? हा आमचा प्रश्‍न आहे, असे मोर्चाच्या वतीने म्हटले आहे. 

येत्या रविवारी होणारी परीक्षा फक्त 200 जागांकरिता आहे. त्यासाठी सुमारे 2 लाख 61 हजार विद्यार्थ्यांना वेठीस धरून परीक्षेचा अट्टाहास म्हणजे मराठा आरक्षणावरील स्थगितीच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत. त्यानंतरच आयोगाच्या परीक्षा घ्याव्यात, ही आमची भूमिका आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com