जेईई आणि नीट परीक्षा रद्द करा, कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरींचे मोदींना पत्र  - Cancel JEE and Nit exams, Congress leader Adhir Ranjan Chaudhary's letter to Modi | Politics Marathi News - Sarkarnama

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करा, कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरींचे मोदींना पत्र 

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्याबाबत देशातील काही पक्षांबरोबर राज्यही आग्रही आहेत.

नवी दिल्ली : कोविड-19 जोपर्यंत स्थिरस्थावर होत नाही तोपर्यंत जेईई आणि नीट परीक्षा रद्द करावी अशी मागणी लोकसभेतील कॉंग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. 

चौधरी यांनी तसे ट्विट केले आहे. जेईई आणि नीट परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी जेव्हा परीक्षा केंद्रावर जातील तेव्हा ते प्रचंड तणावाखाली असतील त्याचा विचार करून पतंप्रधान मोदी यांनी ही परिक्षा रद्द करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्याबाबत देशातील काही पक्षांबरोबर राज्यही आग्रही आहेत. काहींना ही परीक्षा व्हावी असे वाटते. मात्र आता कॉंग्रेसही ही परीक्षा होऊ नये यासाठी आग्रही आहे. 

हेही वाचा  
मानसिकतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो : रोहित पवार
 
जेईई आणि एनईईटी (JEE & NEET) ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी निर्णायक असतात. कोरोनाचे संकटात या परीक्षा घेण्याबाबत विद्यार्थी आणि पालक यांची सध्या मनस्थिती नाही. परीक्षा घेतली त्यांच्या मानसिकतेवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. केंद्र व राज्य सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे. याबाबत रोहित पवार यांनी टि्वट केलं आहे. 

#ProtestAgainstExamInCOVID च्या माध्यमातून परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मोहीमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी जेईई व अन्य परीक्षा घेण्याच्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्णयाला विरोध केला आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनीही टि्वट केलं आहे. 
आपल्या टि्वटमध्ये मुंडे यांनी म्हटले आहे की देशभरात कोरोनाचं संकट मोठं आहे. 

कोरोनाशी लढताना सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहे. या कोरोना काळात परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. बहुतांश शैक्षणिक संस्थांमध्ये क्वारांटाइन सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थी हे सध्या कोरोनाशी लढत आहे. जेईई व अन्य परीक्षा घेऊ नये, या विद्यार्थ्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख