अधिकाऱ्यांच्या एका चुकीमुळे बुलडाणा जिल्ह्याचे अनलॅाक लांबणीवर..

चुकीची माहिती पोर्टलमध्ये दिल्याने पॅाझिटिव्हीटीचा रेट वाढला.
Sarkarnaa Banner (2).jpg
Sarkarnaa Banner (2).jpg

बुलढाणा :  राज्यात आजपासून 5 टप्प्यात अनलॉक सुरु झाले आहे. पहिल्या टप्यात १८ जिल्हे अनलॉक झाले आहेत. त्यात बुलडाणा जिल्ह्याचा सुद्धा समावेश होता. पण एका अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बुलडाणा जिल्हा आज अनलॅाक होऊ शकला नाही. Buldhana district is still Lakdown due to misinformation

बुलढाणा जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी चुकीची माहिती राज्याच्या पोर्टलमध्ये दिल्याने बुलडाणा जिल्ह्याचा पॅाझिटिव्हीटीचा रेट वाढला. त्यामुळे जिल्हा आता तिसऱ्या टप्यात अनलॅाक होणार आहे. त्यामुळे एका अधिकाऱ्याच्या चुकीमुळे अनलॅाक होण्याची प्रतिक्षा संपूर्ण जिल्ह्याला करावी लागत आहे. पॅाझिटिव्हीची अचूक माहिती लवकर राज्याच्या पोर्टलमध्ये देण्यात येईल. त्यामुळे जिल्हा लवकरच अनलॅाक होईल, असे बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॅा. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले.  

हेही वाचा : तर पहिल्या टप्प्यातील १० जिल्ह्यातही निर्बंध वाढतील ! 
मुंबई : महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत, असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. राज्यात सध्या दहा जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्ह्यात निर्बंध आहेत तर काही जिल्ह्यात जास्त निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले, तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होवू, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला. जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा, असे मलिक म्हणाले. 

मुख्यमंत्री ठाकरेंचा गैरव्यवहार उघड करणार म्हणून गावबंदी..सोमय्यांचा आरोप
कोर्लई (रायगड) : कोलई गावात घराच्या बाहेर पडण्यासाठी तसेच गावात अन्य कोणी येण्यासंबंधात प्रतिबंध लादला गेला आहे.  गावाचा शेवटचा कोरोना रुग्ण बरा होऊन नंतर 28 दिवसपर्यंत हा लॉकडाऊन, गाव बंदी राहिल, असा आदेश अलिबाग प्रशासनाने 3 जूनला काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी कोलई गावात खरेदी केलेल्या बंगल्याबाबत माहिती घेण्यासाठी येणार असल्यामुळे गावबंदी केली असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी केला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com