ट्रकमधून ट्रॅक्‍टर आणून तो पेटविणे हा कॉंग्रेसचा ड्रामा, जावडेकर संतापले  - Bringing a tractor out of a truck and setting it on fire is a Congress drama, Javadekar gets angry | Politics Marathi News - Sarkarnama

ट्रकमधून ट्रॅक्‍टर आणून तो पेटविणे हा कॉंग्रेसचा ड्रामा, जावडेकर संतापले 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

या विधेयकाविरोधात इंडिया गेटजवळ युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

नवी दिल्ली : कृषी विधेयकावरून देशातील जनतेची आणि शेतकऱ्यांची जी दिशाभूल करीत आहे त्याची कॉंग्रेसला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिरजू यांनी आज दिला आहे. 

या विधेयकाविरोधात इंडिया गेटजवळ युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग हे ही आक्रमक झाले आहेत. कॉंग्रेसने कृषि विधेयकावरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही जोरदार घोषणा दिल्या.

या आंदोलनावर  रिजजू यांनी  टीकेचा भडिमार केला आहे. ते म्हणाले, की कृषी विधेयकावरून कॉंग्रेस देशातील जनतेची आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. कॉंग्रेसला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.आंदोलनादरम्यान कॉंग्रेसचे कार्यकर्ते सार्वजनिक मालमत्तेची जी हानी करीत आहेत ते योग्य नाही. 

रिजजू यांच्याप्रमाणे मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही कॉंग्रेसवर टीका केली आहे. एका ट्रकमधून ट्रॅक्‍टरमधून ट्रॅक्‍टर आणून तो जाळण्यात आला. कॉंग्रेसचा हा ड्रामा आहे असे ते म्हणाले. 

पंजाबचे मुख्यमंत्री मैदानात 
चंडिगड : मोदी सरकारने आणलेल्या कृषि विधेयकाविरोधात पंजाबचे मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झालेले दिसून येत आहेत. ज्या दिवशी हे विधेयक संसदेत मंजूर झाले त्या दिवसापासून सातत्याने ते या विधेयकाला विरोध करीत आहेत. भाजपचे नेते अमरिंदरसिंग यांनाही लक्ष करीत आहेत. पंजाबध्ये जे शेतकरी आंदोलन करीत आहेत त्यामध्ये कॉंग्रेसचेच कार्यकर्ते अधिक असल्याचा आरोप केला आहे. 

भाजपच्या टीकेकडे दुर्लक्ष करीत अमरिंदरसिंग हे शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त अमरिंदरसिंग यांनी सरकारविरोधात आपला आवाज बुलंद केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या या तिन्ही विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कालच मोहर उठविली आहे. खऱ्या अर्थाने हे विधेयक मंजूर झाले असली तरी विशेषत: पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी मात्र याला विरोध करणे सोडले नाही. 

या विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागेल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या विधेयकाबाबत सरकारने फेरविचार करावा अशी मागणी होत आहे. मात्र मोदी सरकारने हे विधेयक कसे शेतकऱ्यांच्या हिताचे हे भाजपची मंडळी सांगत आहेत. 

इंडिया गेटजवळ आंदोलन करणाऱ्या युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका ट्रॅक्‍टर पेटवून दिला आहे. या घटनेप्रकरणी काही आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. इंडिया गेटजवळ जेथे आंदोलन करण्यात येत आहे तेथे युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे एका हे ट्रॅक्‍टर एका ट्रकमधून आणले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख