ठाकरे सरकारचा श्रीपाद छिंदमला दणका..  - Bombay High Court slams Shripad Chindam petition was rejected  | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारचा श्रीपाद छिंदमला दणका.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 7 जानेवारी 2021

श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा सरकारचा आदेश कायम, या आदेशाविरोधात छिंदमने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. 

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये दणका दिला होता. श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती.

ठाकरे सरकारच्या निर्णयाला छिंदमने हायकोर्टात आव्हान दिले होते. परंतु सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला दणका दिला. श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा सरकारचा आदेश कायम, या आदेशाविरोधात छिंदमने केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. 

अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले होते. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात छिंदमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या निर्णयाला उच्च न्यायालयानेही श्रीपाद छिंदम याचिका फेटाळली आहे. ठाकरे सरकारच्या निर्णयाला छिंदमने हायकोर्टात आव्हान दिले होते. परंतु सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला दणका दिला. 

औरंगाबाद खंडपीठाने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी छिंदम याचा हा अर्ज फेटाळला असल्याची माहिती अॅड. विनायक होन यांनी दिली. छिंदम याने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर महापालिकेतर्फे अॅड. होन आणि सरकारतर्फे अॅड. डी. आर. काळे यांनी बाजू मांडली.

काय आहे प्रकरण
 
श्रीपाद छिंदम हा अहमदनगर महापालिकेत २०१८ मध्ये उपमहापौरपदी असताना फोनवरील संभाषणादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपवरुन छिंदम यांच्यावर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला होता. 

भाजपवर राज्यभरातून यावर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमधून त्याची हकालपट्टी झाली. पुढे त्याला नगरसेवक पद गमवावे लागले. यानंतर छिंदम पुन्हा डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यामध्ये तो एक हजार ९७० मतांनी निवडून आला होता. २०१९ मध्ये त्याने विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.यात त्याचा पराभव झाला होता.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख