कंगनाचे बांधकाम पाडण्यासाठी मुंबई पालिकेने शोधली होती ही नऊ कारणे - bmc identifies nine reasons to demolish construction by Kangana | Politics Marathi News - Sarkarnama

कंगनाचे बांधकाम पाडण्यासाठी मुंबई पालिकेने शोधली होती ही नऊ कारणे

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

हे प्रकरण पण न्यायालयात जाण्याची चिन्हे आहेत. 

मुंबई : शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यातील युद्धात अखेर मुंबई महापालिका उतरली. महापालिकेेने कंगनाच्या आॅफीसचे अनधिकृत बांधकाम पाडून टाकले. ते काढून टाकण्यासाठी तिला चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती. हे बांधकाम अनधिकृत आहे, हे पालिकेने विविध आठ मुद्यांच्या आधारे ठरविले होते.

1)ग्राऊंड फ्लोअरवरील टॉयलेटला ऑफिस केबिन मध्ये रूपांतरीत केले आहे

२) स्टोअर रूमचे किचन रूममध्ये रूपांतर 

3) ग्राऊंड फ्लोअरवर पायऱ्यांवर अनधिकृत टॉयलेट 

4) तळ मजल्यावर अनधिकृत किचन तयार

5 ) देवघर आणि लिव्हिंग रूम अनधिकृत केबिन आणि लाकडी पार्टिशन 

6 ) पहिल्या मजल्यावर अनधिकृत शौचालय

7 ) समोर बाजूस अनधिकृत स्लॅबची निर्मिती

8 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत जिना निर्मिती

9 ) दुसऱ्या मजल्यावर अनधिकृत बाल्कनी निर्मिती

कंगना राणावतचे वकिल रिजवान सिद्दीकी यांनी आपले म्हणणे पालिकेसमोर मांडले होते. परंतु या उत्तरावर पालिका सहमत झाली नाही. त्यामुळे आज सकाळीच नवीन नोटीस लावण्यात आली होती. त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास बांधकाम पाडण्यास सुरवात झाली. या कारवाईच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्या आधीच पालिकेने तोडफोड थांबवली. 

 हा सवाल विचारलाय शिवाय मुंबईला पाकिस्तान आणि POK म्हणणं या कंगणाचा विधानांवर देखील भाजपने आक्षेप घेतलाय, आमदार आशिष शेलार यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर ने

शिवसेनेने कंगनाच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत भाजपने टीका केली. बीएमसीला या आधी हे अनधिकृत बांधकाम दिसले नाही का, असा सवाल भाजपचे नेते आशिष शेलार यांनी विचारला. कंगना हिनेही सेनेवर टीका करत मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा टोला लगावला. तसेच पालिकेला बाबरची उपमा दिली.

.

....

.....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख