भाजपचे नड्डा म्हणतात, "" देश नरेंद्र मोदींमुळे सुरक्षित !''  - BJP's Nadda says, "The country is safe because of Narendra Modi!" | Politics Marathi News - Sarkarnama

भाजपचे नड्डा म्हणतात, "" देश नरेंद्र मोदींमुळे सुरक्षित !'' 

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑक्टोबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज नड्डा यांच्या हस्ते येथील गांधी मैदानात झाला.

गया(बिहार) : जसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सुरक्षित आहे, तसा बिहार नितीशकुमारांच्या हाती सुरक्षित आहे. यावेळीही राज्यात एनडीएचेच सरकार येणार आणि नितीशकुमारांनाच मुख्यमंत्री बनविणार आणि एनडीएचे सरकार ते चालवतील याबाबत कोणतीही शंका घेण्याची गरज नाही असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज नड्डा यांच्या हस्ते येथील गांधी मैदानात झाला. यावेळी त्यांनी नितीशकुमार यांचे तोंड भरून कौतुक केले. तसेच मोदी है तो मुमकीन है. केंद्रात मोदी आणि राज्यात नितीशकुमार हे ठरले आहे असेही ते म्हणाले. निवडणुकीनंतर निकाल येतील. एनडीएला बहुमत मिळेल आणि नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री होती. 

एनडीएची संपूर्ण ताकद त्यांच्या मागे उभी आहे असे सांगून ते म्हणाले, की मोदी सरकारने जे काम केले आहे त्या कामाबद्दल आम्ही लोकांकडे मत मागत आहोत. मोदींप्रमाणेच नितीशकुमारांनीही राज्यात खूप काम केले आहे. लॉकडाऊनच्या काळात जे लोक बाहेर होते त्यांच्याही खात्यात पैसे जमा केले आहेत. त्यांची काळजी त्यांनी घेतली आहे. 

नड्डा यांनी लोक जनशक्ती पक्षाचे नाव न घेता या पक्षाचे सर्वेसर्वा चिराग पासवान यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, की निवडणूक ही दोस्ती मैत्रीची नसते, जातीपातीचीही नसते. मात्र निवडणूक ही आपल्या भागाचा विकास कसा झाला. राज्याचा विकास कसा झाला यावर लढल्या जातात. त्यामुळे यावेळीही नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएलाच बहुमत मिळणार आहे. यावेळी जेडीयूचे राष्ट्रीय सरचिटणीस आर. सीपी, सिंह उपस्थित होते.  

 मालमत्ता प्रमाणपत्राचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप 

नवी दिल्ली : ग्रामीण भारतात मोलाचा बदल घडवून आणण्याची क्षमता मालमत्ता प्रमाणपत्रात असून या माध्यमातून गावातील लोकांना आर्थिक लाभ मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे, असा दावा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वामित्व’ योजनेअंतर्गत मालमत्ता प्रमाणपत्राचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख