धनगर आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा भाजपाचा डाव...

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रकरणाच्या आडून धनगर आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा भाजपाचा डाव आहे." असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे
3anil_gote_1
3anil_gote_1

पुणे : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर प्रकरणाच्या आडून धनगर आणि मराठा समाजात भांडणे लावण्याचा भाजपाचा डाव आहे." असा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे."पडळकर यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर भाजपचे नेते काय प्रतिक्रिया उमटते याची वाट बघत बसले होते. प्रविण दरेकर यांच्यासारखा नेता पडळकर यांच्या समर्थनार्थ उतरतो, यावरून भाजपची या प्रकरणातील भूमिका लक्षात येते," असेही अनिल गोटे म्हणाले.

"शरद पवार यांच्याबद्दल विधान केल्यावर पडळकर माफी मागतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र, माफी मागायची राहिलीच पण त्यांच्या प्रतिमेला दुधाचे अभिषेक केले जात आहेत. त्यांचे समर्थन केले जात आहे. यामागे धनगर आणि मराठा समाजात भांडणे लावण्याची भाजपची रणनीती आहे," असा आरोप गोटे यांनी केला आहे.

"पडळकर यांच्या विधानानंतर ते माफी मागतील अस फडणवीस आणि पाटील म्हणाले होते मात्र फटाक्याच्या माळा लावून त्यांचे स्वागत केले जात आहे.आमच्या धनगर समाजातील काही तरुणांना उचकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पडळकर यांच्या नथीतून मराठा समाजातील नेत्यांवर तीर मारला जात आहे," असा आरोप गोटे यांनी केला आहे," राम कदम मला म्हणतात 'अनिल गोटे यांचे वय झाले आहे. माझ्या वयाची त्यांना कसली अडचण आहे ? वयाचा आणि वक्तव्याचा काय संबंध ? त्यांना एकच सांगायचे आहे. 

समुद्र किनारी जाऊन तोकड्या चड्डीत फोटो सेशन केलेत. राहुल महाजन यांच्यासोबत महिलेशी केलेल्या वर्तनावर  वयाचे मूल्यमापन करायचे काय ? माझ्यावर जेवढे व्यक्तिगत आरोप कराल तेवढे त्याच भाषेत उत्तर देईन. माझ्या नादाला लागू नका," असा इशारा गोटे यांनी दिला आहे.

हेही वाचा : शरद पवारांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी एक्स्प्रेस वेवर  उलटली..


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने जात असताना या ताफ्यातील पोलीसांची पायलट जीप मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अमृतांजन पुलाच्या खाली आज सकाळी उलटली. यामध्ये एकाला किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक्स्प्रेस वे वरुन पवार यांच्या वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेन जात होता. त्यावेळी पायलट कार अमृतांजन पुलाच्या खाली उलटली. पवार यांची गाडी सुखरुपपणे पुढे गेली. आज सकाळी खोपोली शहराच्या परिसरात एक्स्प्रेस वे वर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वाहनाची कोंडी झाली होती. ही कोंडी सुटत असतानाच पवार यांच्या ताफ्यातील पोलिस कार उलटली. एक्स्प्रेसवे वरील देवदूत पथकाने व महामार्ग पोलिसांनी तात्काळ या जीपचा चालक व जखमी पोलिसावर उपचार केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com