Narendra Modi 1.
Narendra Modi 1.

राज्यसभेत भाजपचे बहुमताचे स्वप्न अजूनही अपूर्णच...

सर्वाधिक ८ जागा मिळाल्या आहेत, तरीही वरिष्ठ सभागृहातील स्पष्ट बहुमतापासून भाजप तसेच भाजप आघाडी (एनडीए) अजूनही दूरच आहे. त्यामुळे भाजपचे राज्यसभेत सत्तारूढ पक्षासाठी बहुमताचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहणार आहे.

नवी दिल्ली : राज्यसभेसाठी शुक्रवारी देशातील आठ राज्यात निवडणूका झाल्या. 19 जागेसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपला 8 तर कॅाग्रेसला 4 जागा मिळाल्या आहेत. भाजपला राज्यसभेच्या निवडणूकीत सर्वाधिक ८ जागा मिळाल्या आहेत, तरीही वरिष्ठ सभागृहातील स्पष्ट बहुमतापासून भाजप तसेच भाजप आघाडी (एनडीए) अजूनही दूरच आहे. त्यामुळे भाजपचे राज्यसभेत सत्तारूढ पक्षासाठी बहुमताचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहणार आहे. शिवसेनेने अलीकडे साथ सोडली तरी राज्यसभेच्या संख्याबळात दणदणीत प्रतिनिधीत्व असणाऱ्या अण्णाद्रमुक, वायएसआर कॉंग्रेस व बिजू जनता दलाचा पाठिंबा आपल्याकडे वळवून घेण्यात भाजपने यश मिळविले आहे. तरीही राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळविणे हे भाजप नेतृत्वाचे लक्ष्य अजून बाकी आहे.

भाजप आघाडीकडे आता ११५-११६ खासदार झाले आहेत. राज्यसभेत २४५ इतकी पूर्ण सदस्यसंख्या असेल तर साध्या बहुमतासाठी १२३ मते लागतात. स्पष्ट बहुमतासाठी आता पक्षाला उत्तर प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकांची वाट पहावी लागणार आहे. या वषर्आअखेर उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर भाजपला किमान १० जागा मिळाल्यावर येथे पक्ष स्पष्ट बहुमतात येईल, असा विश्‍वास पक्षनेते व्यक्त करत आहेत.


लोकसभेत सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळविण्याचा चमत्कार करणाऱ्या भाजपला राज्यसभेत बहुमत नसले तरी अमित शहा फॉर्म्यूला वापरून कळीची विधेयके येथेही सहजपणे मंजूर होऊ शकतात हे भाजपने गेल्या वर्षभरात किमान ५ वेळा दाखवून दिले आहे. जम्मू-काश्‍मीरचे ३७० कलम रद्द करणे, ऐतिहासिक वारसास्थळे, वादग्रस्त नागरिकत्व दुरूस्ती कायदा, तोंडी तलाक यासारखी विधेयके भाजपने राज्यसभेतही मंजूर करून घेण्यात यश मिळविले आहे.

भाजपला गुजरातमध्ये तीन, मध्यप्रदेशमध्ये दोन आणि राजस्थान, झारखंड आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेवर विजय मिळविला आहे. तर  कॅाग्रेसला राजस्थानमध्ये दोन आणि मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये एक एक जागेवर समाधान मानावे लागले आहे. निवडणूकीत जास्त जागा मिळवूनही भाजप वरिष्ठ सभागृहातमध्ये बहुमतापासून दूर आहे. या निवडणूकीत दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे आणि शिबू सोरेन यासारख्या ज्येष्ठ नेते सहज निवडणूक आले आहेत. आंध्रप्रदेशमध्ये सत्तारूढ वाईएसआर कॅाग्रेसने सर्व चार जागांवर विजय मिळविला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com