गिरीश महाजनांच्या तालुक्यातच एकनाथ खडसेंचा दे धक्का! - bjp workers from girish mahajan jamner tehsil joins ncp in presence of eknath khadse | Politics Marathi News - Sarkarnama

गिरीश महाजनांच्या तालुक्यातच एकनाथ खडसेंचा दे धक्का!

कैलास शिंदे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

भाजपमधून एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर शेकडो भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल होत आहे. खडसे यांनी गिरीश महाजनांना त्यांच्या जामनेर तालुक्यातच मोठा धक्का दिला आहे. 

मुक्ताईनगर : एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमधील कोणीच जाणार नाही, असा दावा करणारे भाजप नेते गिरीश महाजन यांनाच आता मोठा धक्का बसला आहे. महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी बु येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आगामी काळात भाजप कायकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचे कार्यक्रम सुरूच राहणार आहेत.  

या वेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, काही लोक म्हणत आहेत नाथाभाऊसोबत भाजपच्या पदाधिकारी अथवा नेत्यांनी प्रवेश केला नाही. परंतु, दिवाळीनंतर जळगाव येथे प्रवेश सोहळा घेऊन या लोकांना दाखवून देऊ नाथाभाऊसोबत कोण आहे. नेते हे कार्यकर्त्यांमधूनच घडत असतात म्हणून पक्ष संघटनेसाठी प्रवेश करणारा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष बळकट होऊन यातूनच उद्याचा नेता  घडत असतो. 

मुक्ताईनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे, सुरत येथील उद्योजक आबा पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले, की जामनेर तालुक्यातील ही सुरुवात आहे. अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून आगामी काळात जामनेर तालुका राष्ट्रवादीमय करू. 

या वेळी देवपिंप्रीतील बाळू पाटील, गोपाळ पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, अनिल सखाराम पाटील, गणेश बोरसे, तुळशीराम डोंगरे, दामू चिकटे,पोपट शेळके, नेरी बु येथील प्रमोद खोडपे, जयेश पाटील, सुरेश पाटील, दत्ता वाघोडे, विशाल कोळी, दानिश पिंजारी, बेबीताई सखाराम पाटील, लताबाई भावलाल पाटील, सुशीलाबाई जगन्नाथ पाटील, कल्पना बाई बाळू पाटील, रत्नाबाई सुभाष पाटील यांच्यासह मुक्ताईनगर भाजप सरचिटणीस सुनिल काटे, भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप जावळे आणि जामनेर तालुक्यातीलशेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

या वेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सईश्वर राहणे, माजी सभापती विलास धायडे, जामनेर तालुका किसान सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गोटूभाऊ मगर, शरद पाटील, सागर कुमावत, माजी सभापती राजू माळी, नगरसेवक शकील सर, मस्तान कुरेशी, बापू ससाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख