उमेदवारी अर्ज भरण्याआधीच भाजपनं ममतांविरोधात टाकला पहिला डाव

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागेल.
BJP urge Election Commission to take action against Mamata Banerjee
BJP urge Election Commission to take action against Mamata Banerjee

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी त्यांना ही निवडणूक जिंकावीच लागेल. तर भाजपनंही त्यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. ममतादीदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधीच भाजपनं आपला पहिला डाव टाकला आहे. (BJP urge Election Commission to take action against Mamata Banerjee)

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रीपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. 

भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी निवडणूक आयोगाकडं ममता बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुर्गा पूजा समित्यांसाठी रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा आचारसंहितेचा भंग असल्यानं त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखत कारवाई करावी, अशी मागणी भाजपनं आयोगाकडं केली आहे. आता आयोगाकडून यावर कोणाता निर्णय घेतला जाणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

बंगाल सरकारनं मंगळवारी राज्यातील दुर्गा पूजा समित्यांना यावर्षी 50 हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा केली आहे. कोरोना संकटामुळं दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्यात अनेक आर्थिक अडचणी येत आहेत. बंगालमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळं हे अनुदान दिले जाणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानं शनिवारी बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समसेरगंज आणि जंगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी मतदान होईल. तर तीन ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. इच्छूकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्यानं ममता बॅनर्जी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सहा महिन्यांच्या आत त्यांना निवडणूक लढवून विजयी होणं आवश्यक आहे. पण कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आयोगाकडून अद्याप तारखा जाहीर करण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे तृणमूल काँग्रेसकडून सातत्याने याबाबत पाठपुरावा सुरू होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com