राज्यपाल कोट्यातील १२ आमदारांची नावे ठाकरे सरकार बदलणार? 

या १२ नावांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना प्रत्येकी ४ जागा आहेत.
 Uddhav Thackeray, png
Uddhav Thackeray, png

मुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यातील राजकारणात घमासान सुरू आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सातत्याने कलगीतुरा बघायला मिळत आहे. राज्यपालांकडे १२ जणांची नावे पाठवलेली आहेत, मात्र राज्यपाल दिरंगाई करत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून होत आहे. याच मुद्द्यावरून आता भारतीय जनता पक्षाने (Bjp) उत्तर दिले आहे. आरटीआय उत्तराचा हवाला देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. (BJP spokesperson Keshav Upadhyay's criticism of the state government)

या सगळ्या प्रकरणाला आता नवीनच वळण मिळताना दिसत आहे. या संदर्भात भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी ट्वीट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणाले की ''त्या १२ आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अतंर्गत उत्तर. प्रश्न होता-प्रस्ताव कधी पाठवला? कोणती नावे पाठविली? काही उत्तर आले का? हा प्रस्तावच विचाराधीन असल्याचे सांगितले आहे, मात्र आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?,''

"कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोळगे यांनी ही माहिती RTI अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला हवा…पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का?,'' असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. 

पूर्वी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेली नावे बदलणार आहेत का असा प्रश्न उपाध्ये यांनी उपस्थित केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या १२ नावांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना प्रत्येकी ४ जागा आहेत. या पक्षांचा कोटा आता बदलतो आहे का? असे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे बदलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

या यादीमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, (Eknath Khadse) राजू शेट्टी,  यशपाल भिंगे, आनंद शिंदे, काँग्रेसचे रजनीताई पाटील, प्रवक्ते सचिन सावंत,( Sachin Sawant) मुझफ्फर हुसैन, अनिरुद्ध बनकर,  शिवसेनेच्या उर्मिला मातोंडकर, (Urmila Matondkar) नितीन बानगुडे पाटील, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर यांनी नावे असल्याची चर्चा आहे.    

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे 12 आमदारांच्या नावाची यादी मागितली होती. मात्र, सचिवालयाने अशी यादी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यावरुन राजकारण सुरु झाले होते. त्यानंतर गोपनीयतेच्या कारणामुळे राजभवनाला ही यादी देता येणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण सचिवालयाकडून देण्यात आले होते, त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती, त्याला उत्तर देत उपाध्ये यांनी राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. 
 Edited By - Amol Jaybhaye   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com