असेही राजकारण : कोरोना बेड घोटाळ्याला भाजप नेत्यांकडून धार्मिक रंग

भाजप खासदारांनीच बेड वॅार रुममधील मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
BJP MP Tejasvi Surya finds communal angle in bed scam
BJP MP Tejasvi Surya finds communal angle in bed scam

बेंगलुरू : रुग्णांना बेड मिळण्यासाठी हजारो रुपयांची लाच द्यावी लागत असल्याचे समोर आले आहे. भाजपची (BJP) सत्ता असलेल्या महापालिकेमध्ये एका बेडसाठी तेथील कर्मचारी 25 ते 50 हजारांची लाच घेत होते. हा बेड घोटाळा (Bed Scam) उघडकीस आल्यानंतर आता त्याला धार्मिक रंग दिला जात आहे. हा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या भाजप खासदारांनीच बेड वॅार रुममधील (Covid War Room) मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. (BJP MP Tejasvi Surya finds communal angle in bed scam)

बेंगलुरू महापालिकेच्या रुग्णालयांसाठी केंद्रीय बेड नोंदणी पध्दत ठेवण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र वॅार रुम तयार करण्यात आली आहे. यामध्येच घोटाळा होत असल्याचा आरोप भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी केला आहे. बेंगलुरू महापालिकेसह कर्नाटकातही भाजपचीच सत्ता आहे. त्यामुळे सुर्या यांच्या आरोपांची मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी तातडीने दखल घेत चौकशीचे आदेश दिले. 

पण, सुर्या यांनी या घोटाळ्याला धार्मिक रंग दिला आहे. सुर्या यांचे याबाबतचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सुर्या यांचे नातेवाई रवी सुब्रमण्यम आणि सतिश रेड्डी हे तिघे वॅार रुममधील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. वॅार रुममध्ये काम करत असलेल्या 17 मुस्लिम कर्मचाऱ्यांविषयी ते प्रश्चचिन्ह उपस्थित करत असल्याचे त्यात दिसते. वॅार रुममधील केवळ मुस्लिम कर्मचाऱ्यांचीच नावे वाचत असल्याचे ते दिसत आहेत.

सुर्या यांच्या आरोपांचा फटका महापालिका सह आयुक्त सरफराज नवाज यांनाही बसला आहे. बेड घोटाळ्याला धार्मिक रंग देताना सरफराज यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्यावर आरोप करताना या प्रकरणाला धार्मिक रंग देण्यात आला आहे. याचे खुप दु:ख होत आहे. या विभागाची कसलीही माहिती नसलेले माझ्यावर आरोप करत आहेत, असे सरफराज म्हणाले. 

दरम्यान, सरफराज यांचे या प्रकरणात नाव आल्यानंतर सुर्या यांनी त्यांची माफीही मागितली आहे. सुर्या यांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. माजी मुख्यमंत्री सिध्दरामैय्या म्हणाले, या मुद्याला धार्मिक रंग देणे म्हणजे सुर्या यांची असंवेदनशीलता दर्शविते. हा प्रकार दुर्दैवी आहे. 

काय आहे प्रकरण?

सुर्या यांनी केलेल्या आरोपांनुसार, महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संगनमत आहे. त्यातून बेडसाठी गैरव्यवहार केले जात आहेत. कोरोनाबाधित पण घरीच उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नावाने काही बेड बुक केले जातात. त्यानंतर या बेडसाठी इतरांकडून 25 ते 50 हजार रुपयांची लाच घेतली जाते. चार हजारांहून अशा केस समोर आल्या आहेत. आरक्षित केलेल्या बेड पैसे न मिळाल्यानंतर खुल्या केल्या जात आहेत. हे बेड 12 तासांसाठी आरक्षित केल्या जात आहेत. त्यानंतर त्या लाच घेऊन दिल्या जात असल्याचे सुर्या यांनी सांगितले. 

सुर्या यांनी केलेल्या आरोपांनंतर कर्नाटकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. बेंगलुरू महापालिकेतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून नेत्रावती व रोहित कुमार या दोघांना अटक केली आहे. बेंगलुरूमध्ये बेड आरक्षणासाठी हे दोघे एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com