भाजप खासदार म्हणतात कोरोनाविरुद्धच्या लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या...

कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे ठरणार'' नसल्याचे म्हटले आहे.
  Nitin Gadkari .jpg
Nitin Gadkari .jpg

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत दररोज साडेतीन लाखांहून अधिक नवे रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात आहे. आता थेट भारतीय जनता पक्षाचे (BJP) राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी केंद्राला घरचा आहेर दिला आहे. BJP MP says give leadership to Gadkari in fight against Corona

या संदर्भात सुब्रमण्यम स्वामी (Subramaniam Swamy) यांनी एक ट्वीट केले आहे. त्यामध्ये स्वामी म्हणाले की ''ज्याप्रमाणे भारत इस्लामिक आक्रमणे आणि ब्रिटीश साम्राज्यवाद्यांनंतरही टिकून राहिला त्याचप्रमाणे आपण कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करुन नक्कीच टीकू. आता आपण नीट काळजी घेतली नाही, योग्य निर्बंध लावले नाहीत तर मुलांवर परिणाम करणारी आणखीन एक लाट आपल्याकडे येईल. म्हणून मोदींनी या कोरोनाविरुद्धच्या युद्धाची जबाबदारी गडकरींकडे सोपवावी. पंतप्रधान कार्यालयावर अवलंबून राहणे फायद्याचे ठरणार'' नसल्याचे म्हटले आहे. 

एका दुसऱ्या ट्विटमध्ये स्वामी म्हणाले की मी पंतप्रधान कार्यालयासंदर्भात भाष्य केले आहे. तो एक विभाग आहे. पंतप्रधान कार्यालय म्हणजे पंतप्रधान नाहीत हे लक्षात घ्या, स्वामी यांच्या या ट्विटवर सध्याचे आरोग्यमंत्री असणाऱ्या हर्ष वर्धन यांना पदावरुन काढून टाकण्याची मागणी केली त्यावरही स्वामींनी उत्तर दिले.  ''नाही, हर्ष वर्धन यांना मोकळेपणे काम करु दिले जात नाही. मात्र अधिकार वाणीने बोलणाऱ्या नेत्यांसारखे ते नसून खूपच नम्र आहेत. गडकरींच्या सोबत काम केल्याने त्यांच्यातील हा गुण नक्कीच बहरेल,'' असे स्वामी म्हणाले आहेत. 

सुब्रमण्यम स्वामी यांच्या या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्वीटरवर अनेकांनी स्वामींनी सुचवलेल्या पर्यायाला पसंती दर्शवल्याचे ट्विट केले आहेत. तर गडकरी हा शब्द सध्या ट्विटरवर ट्रेण्ड होत आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) सध्या केंद्रामध्ये रस्ते वाहतूक मंत्री आहेत. 

देशात कोरोना (Corona) परिस्तिती गंभीर होत चालली आहे. अनेक राज्यामध्ये ऑक्सिजन आणि कोरोना अौषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे देश पातळीवर या सर्व गोष्टींचे योग्य नियोजन होण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com