'एसटी'तील सचिन वाझे कोण? कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी पडळकर मैदानात

एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पडळकरांनी लढा उभारण्याचे ठरविलं आहे.
3Sarkarnama_20Banner_20_202021_07_01T144443.268.jpg
3Sarkarnama_20Banner_20_202021_07_01T144443.268.jpg

पुणे : बैलगाडा शर्यतीवरुन राजकारण पेटविणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर  (gopichand padalkar) आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी आज समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ शेअर करीत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पडळकरांनी लढा उभारण्याचे ठरविलं आहे.   

''महामंडळाला आवश्यकता नसणाऱ्या गोष्टीसाठी हजारो कोटींचे टेंडर काढून खाजगी कंत्राटदारांची संपूर्ण देणी दिली जातात, पण कर्मचाऱ्यांचे मूलभूत पगार दिले जात नाहीत. हे सर्व कुणाच्या टक्केवारीसाठी चालले आहे? परिवहन मंत्र्यांच्या महामंडळातला सचिन वाझे कोण? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे.  एसटी कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात ज्या युनियनने आवाज उठवायला पाहिजे तेच आज प्रस्थापितांच्या तालावर नाचत आहेत,'' असा आरोप पडळकरांनी केला आहे.  

मराठी माणसालाच भाजप परप्रांतीय ठरवतील ; "अंबानी, अदानींना म्हणण्याचे धाडस नाही"
''कुठल्याही दबावाला न जुमानता आपल्या हक्कासाठी लढा उभारा, मी तुमच्या पाठीशी खंबरीपणे उभा आहे. माझे राज्य सरकारकडे मागणे आहे की जे राज्य कर्मचाऱ्यांना तेच एसटी कामगारांना द्या, अन्यथा संघर्ष अटळ आहे,''  असे पडळकर यांनी व्हिडिओत म्हटलं आहे.  येत्या २१ सप्टेंबरला झरे, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथे या लढ्याची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन केल आहे. याठिकाणी जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पडळकर यांनी केलं आहे.  

पडळकर म्हणतात की, आपल्या त्यागाने आणि सेवेने एसटी महामंडळला मोठे करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची वेळ यावी, याचा राग येतो. एकतर तुटपुंजा पगार त्याचाही वेळेवर पत्ता नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत. 

श्री श्री रविशंकर यांच्याशी संवादाची येत्या मंगळवारी संधी 
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते, अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांच्याशी संवादाची संधी २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१० वाजता मिळणार आहे. जीवनात शांती, मैत्री आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी आपण मानवतेचा दृष्टीकोन अंगिकारून स्वतःमध्ये कशाप्रकारे बदल घडवू शकतो, याबद्दल श्री श्री रविशंकर मार्गदर्शन करणार आहेत. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com