नवी दिल्ली : भाजपचे खासदार, बॉलिवूड अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत सनी देओल यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. सनी देओल खासगी कामानिमित्त हिमाचल प्रदेशात आले होते. ते कुलू जिल्ह्यातील मनालीजवळ एका फॉर्म हाऊसमध्ये थांबले आहे. सनी देओल हे एका मित्रासोबत उद्या (ता.3) मुंबईत परतणार होते. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली असल्यामुळे ते क्वारंटाइन झाले आहेत.
कौटुंबिक सुखदुःखात राजकारण नाही#NCP #BJP #Aurangabad #राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/QEUW2gdYRx
— Sarkarnama (@SarkarnamaNews) December 2, 2020
"मी माझी कोरोनाची टेस्ट केली असून त्याचा अहवाल हा पॅाझिटिव्ह आला आहे. सध्या क्वारंटाइन असून माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आपली चाचणी करून घ्यावी. स्वतः क्वांरटाइन व्हावे," असे सनी देओल यांनी टि्वट कलं आहे.
अभिनेते सनी देओल यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिवांनी माहिती दिली.
सनी देओल हे पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघाचे भाजप खासदार आहेत. हिमाचल प्रदेशातील आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी देओल खासगी कामानिमित्त हिमाचल प्रदेशात आले होते. ते कुलू जिल्ह्यातील मनालीजवळ एका फॉर्म हाऊसमध्ये थांबले होते. ते गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी राहत होते.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सनी देओलने भाजपात प्रवेश केला. त्याला पंजाबमधील गुरदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ नेहमीच भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना इथून खासदार होते. या मतदारसंघातून सनी देओल हे विजयी झाले आहेत.
हेही वाचा : रोम जळत असताना तुम्ही व्हायोलिन वाजवू शकत नाही; कमल हसन
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवरच ठाण मांडल्याने दिल्लीला वेढा पडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या आंदोलनाला मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनी पाठिंबा दिला आहे. कमल हसन यांनी म्हटले आहे की, त्यांनी (पंतप्रधान) केवळ माझ्या शेतकऱ्यांकडे पाहावे. तुम्ही दीर्घ काळ त्यांच्याशी चर्चा केली नसून, ती प्रथम करा. देशासाठी चर्चा करणे अतिशय महत्वाचे आहे. देशाच्या हिताचे घडावे यावर तुमचाही विश्वास आहे. कृषी क्षेत्राची आता काळजी घेण्याची गरज आहे. ही माझी विनंती नाही. मला व्हायोलिनचा आवाज आवडतो. परंतु, आता ती वेळ नाही. रोम जळत असताना तुम्ही व्हायोलिन वाजवू शकत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षीय वाद बाजूला ठेवावेत. शेतकऱ्यांना दिवसेंदिवस पाठिंबा देणारे आवाज वाढत आहेत. अशी परिस्थिती देशाची हिताची असणार नाही. हे आंदोलन चिघळण्याआधी सरकारने तोडगा काढायला हवा, असे हसन यांनी म्हटले आहे.

