राज कुंद्राच्या कंपनीचा अडीच ते तीन हजार कोटींचा गफला; अनेकांची फसवणूक! 

मराठी लोकांना राज कुंद्राच्या कंपनीने फसवले तेव्हा महाराष्ट्र सरकार काय करत होते, असा सवाल त्यांनी केला आहे.
  Ram Kadam, Raj Kundra .jpg
Ram Kadam, Raj Kundra .jpg

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पॉर्न फिल्मची निर्मिती केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पॅार्न फिल्म प्रकरणात अडचणीत असलेल्या कुंद्रावर भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी आणखी एक आरोप केला आहे. त्यामुळे राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे. (BJP MLA Ram Kadam's serious allegations against Raj Kundra) 

कदम म्हणाले, महाराष्ट्रात अनेक तरुणांची फसवणूक झाली आहे. राज कुंद्राने 'विआन इंडस्ट्री' कंपनीच्या माध्यमातून 'जिओडी नावाने ऑनलाइन गेम लॉन्च केला होता. हा गेम पूर्णपणे कायदेशीर मान्यतेने करण्यात आल्याचे त्याने सांगितले होते. जिओडी हा ऑनलाइन गेम आहे ज्यात शिल्पा शेट्टीचे नाव आणि फोटो वापरला आहे. गेममध्ये चेंडू कुठे जाणार हे सांगणाऱ्याना पैसे मिळतात. आपल्या पत्नीचा चेहरा त्यांनी सगळीकडे वापरला आहे. प्रत्येकाला व्यापार करायचे अधिकार आहे. मात्र, कोणाला धोका देण्याचा अधिकार नाही, असेही कमद यांनी सांगितले.

गेमचे वितरणाचे अधिकार देतो असे सांगून अनेक लोकांकडून ३० लाख, १५ लाख, २० लाख असे पैसे घेतले. शिल्पा शेट्टीचा उपयोग ह्या गेमच्या प्रचारासाठी करण्यात आला असे कदम यांनी सांगितले. जवळपास अडीच हजार ते तीन हजार कोटीचा गफला राज कुंद्राच्या कंपनीने केला असल्याचा आरोप त्यांनी केला. जे कोणी पैसे मागायला गेले त्यांना मारहाण केली. सर्व लोकांना फसवले हे कधी कळले तर काही लोकांनी वितरण अधिकार घेतले आणि नंतर कळले की ही गेमच्या नावाने फसवणूक आहे. कोणाचेच पैसे दिले नाही. जिओडी गेमचे पैसे बक्षिसे ही त्यांच्याच कर्मचाऱ्यांना मिळाली, असे कदम म्हणाले. 
 
महाराष्ट्रात हे झाले आहे. मराठी लोकांना राज कुंद्राच्या कंपनीने फसवले तेव्हा महाराष्ट्र सरकार काय करत होते, असा सवाल त्यांनी केला आहे. पैसे मागायला गेलेल्या लोकांना मारहाण झाली तेव्हा अनेकांनी तक्रारी केल्यावर त्यांना न्याय मिळाला नाही. पोलिस कोणत्या दबावात होते, त्यांची नावे पुढे आली पाहिजे. महाराष्ट्रात इतकी मोठी फसवणूक केली तर इतर राज्यात कशी फसवणूक केली असेल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ऍग्रिमेंटचे ओरिजनल पेपर त्यांच्याकडे आणि झेरॉक्स लोकांना द्यायचे. 

मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारने लक्षात घ्यावे की प्रकरण खूप मोठे आहे, लोकांना फसवले आहे त्याचा तपास करून तथ्य समोर आणा आणि आरोपींना जेलमध्ये टाका, अशी मागणी कदम यांनी केली. 3 दिवसात न्याय नाही मिळला नाही तर सोमवारी पोलिस कमिशनर यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच बरोबर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे कदम यांनी सांगितले. जुहू पोलिस स्थेशनमध्ये अभिनेत्रीने तक्रार दिली होती. ती पोलिस आयुक्तांकडे आणि पंतप्रधानांकडे न्याय मिळण्याबाबत मागणी करते. राज कुद्रांने शारिरीक शोषण केले, अशी तक्रार करूनही तो अर्ज पुढे गेला नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव होता. त्यामुळे हे झाले नाही, असा सवाल कदम यांनी केला आहे.

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com