आदित्य ठाकरेंच्या बाबत दाखवलेली तत्परता; विद्यार्थ्यांबाबत का नाही! - BJP MLA Gopichand Padalkar criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात आठवडाभरात राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या वाढदिवसाला अभिष्टचिंतन करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राजभवनाकडे रवाना

आदित्य ठाकरेंच्या बाबत दाखवलेली तत्परता; विद्यार्थ्यांबाबत का नाही!

 विजय पाटील
रविवार, 9 मे 2021

एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार ते सांगा अन्यथा अदोलन करणार

सांगली : मराठा (Maratha Reservation) आणि धनगर समाजाला या सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. अनेक एमसीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली नाही. ठाकरे सरकारने या विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) लगेच कॅबिनेट मध्ये स्थान दिले. आदित्य यांच्या बाबत जसी तत्परता दाखवली तीच तत्परता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या विद्यार्थ्यांच्या बाबतीत का दाखवली नाही, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. (BJP MLA Gopichand Padalkar criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

पडळकर सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती कधी देणार ते सांगा अन्यथा अदोलन करणार, असल्याचा इशारा पडळकर यांनी यावेळी दिला. विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या ठाकरे सरकारला पंढरपूर वासियांनी चोख उत्तर दिलंय. अजितदादांच्या मुखातील मायचा लाल समाधान आवताडे ठरला असून सव्वा वर्षात सरकारला आलेल्या अपयशाची नाराजी जनतेने दाखवली आहे. विश्वासघाताने सत्तेत आलेल्या सरकारला पंढरपूरमध्ये लोकांचा विश्वास जिंकता आला नाही. अशी टीका पडळकर यांनी केली. 

जयंत पाटलांनी शब्द पाळला ; मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण सुरु

दरम्यान, पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की,  मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट आहे, त्यासाठी महाविकासआघाडी जबाबदार आहे. पण उर्वरित समाजाचे काय? मराठा समाजाबरोबरच इतर भटक्या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती आणि जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे.

मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण झालेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. पुढेही आरक्षण न टिकल्यास या जागांचे काय करायचे? इतर सर्व मागासवर्गीय, NT, SC, ST प्रवर्गातील 365 युवकांना नियुक्ती मिळालेली नाही. यांना नियुक्या मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार असूनही सरकार टाळाटाळ करत आहे. याचा उद्रेक झाल्यास सरकारच जबाबदार ठरेल, असा इशारा पडळकर यांनी दिला आहे.

अशी परतवणार नाशिकमध्ये कोरोनाची तिसरी लाट!
 

नियुक्त्यांचा अधिकार हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे. त्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्रपतींना हात जोडून विनंती करण्याची गरज नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना तात्काळ या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पडळकर यांनी पत्रात केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख