अतिरेकी हल्ला होण्याची वाट बघत आहात का?   - BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

अतिरेकी हल्ला होण्याची वाट बघत आहात का?  

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 11 जुलै 2021

मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत नुकतेच ड्रग्स व हत्यारांचे कारखाने सापडले होते.

मुंबई : मुंबईत सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना राज्याचे गृहमंत्री झोपले आहेत का, आणखी एक अतिरेकी हल्ला होण्याची वाट ते बघत आहेत का, असे प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले आहेत. (BJP MLA Atul Bhatkhalkar criticizes the state government)  

हेही वाचा : डॅा. भारती पवारांच्या राज्यमंत्रीपदामागे भाजपचा आहे 'हा' मनसुबा!

मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत नुकतेच ड्रग्स व हत्यारांचे कारखाने सापडले होते. त्यानंतर आता मुंबईत विक्रीस बंदी असतानाही बेकायदा ड्रोन विक्रीचे रॅकेट उघड झाले आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अमली पदार्थ, हत्यारे, ड्रोनची विक्री सुरू असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय, मुंबईत आणखी २६/११ नंतर आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची वाट पाहिली जात आहे का, असे प्रश्न त्यांनी केले आहेत. 

वाझे प्रकरणावरून 'वसुली' सरकार अशी बिरुदावली मिळालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अतिरेकी कृत्ये, हत्यारे, अमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री थांबवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे. 

हेही वाचा : आम्ही काका-पुतण्यांच्या ताटाखालचे मांजर नाही: काँग्रेस नेत्याची पवारांवर कडवट टीका 

गृहविभाग काय करत आहे?

मुंबईत ड्रोन विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेटसुद्धा 'सकाळ' च्या स्टिंग ऑपरेशनमधून उघड करण्यात आले आहे. एका वर्तमानपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमधून एवढे मोठे रॅकेट उघडकीस येते; पण राज्याच्या गृहविभागाला याची माहिती नाही काय, असे प्रश्नही अतुल भातखळकर यांनी विचारले आहेत.    

Edited By - Amol Jaybhaye  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख