भाजपच्या महापौर म्हणतात, "मी पक्ष बघत बसत नाही, तुम्ही फक्त माझ्या डोक्‍यावर हात ठेवा' 

जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले.
The BJP mayor says, "I'm not watching the party, you just put your hand on my head
The BJP mayor says, "I'm not watching the party, you just put your hand on my head

सांगली : सांगलीच्या महापौर गीता सुतार यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेत बैठक घेण्याचे आज (ता. 25 ऑक्‍टोबर) निमंत्रण दिले. या वेळी त्या म्हणाल्या की, "मी पक्ष बघत बसत नाही. साहेब, तुम्ही फक्त माझ्या डोक्‍यावर हात ठेवा. मी लोकांसाठी खूप काम करेन.' त्यानंतर जयंत पाटील यांनीही पुढील आठवड्यात बैठक घेण्याचे मान्य केले. 

मिरजेत महापालिकेच्या आरोग्य केंद्राचे आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी महापौर गीता सुतार यांनी आपल्या भाषणात पालकमंत्री जयंत पाटील यांना शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेत येण्याचे निमंत्रण दिले. 

महापौरांच्या आवाहनाला पालकमंत्री जयंत पाटील यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. ते म्हणाले, सांगलीतील दोन भाजपचे नेते मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार यांच्यावर माझं विशेष प्रेम आहे. कदाचित त्या दोघांचा आदेशावरून महापौर तसे बोलल्या असाव्यात असे मी समजतो. 

ते म्हणाले, मी उद्या येऊन महापालिकेत बसतो, सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊ. पण, तुम्हाला आवडते का नाही, माहित नाही म्हणून मी महापालिकेत येत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी येण्याचे तुम्हीच निमंत्रण दिले आहे. यात पक्षीय भावना नाही. जनतेचे प्रश्न गतीने सुटणे महत्वाचे आहे. 

कोण मंत्री होते आणि कोणाचं राज्य आहे. हे महत्त्वाचं नसते. पक्षीय विषय बाजूला ठेवून लोकांची काम करणे गरजेचे असतात. कुपवाड ड्रेनेजचा प्रस्ताव आणि शेरीनाल्याचे काम याचा आढावा घेण्यासाठी पुढच्या आठवड्यात महापालिकेत बैठक घेऊ. आणखी काही अडीअडचणी समस्या असतील, तर त्याही सोडवू. या शहरातील सामान्य माणसं विकासाचा आग्रह धरणारी आहेत, असे पाटील म्हणाले. 

विरोधी पक्ष नेते उत्तम साखळकर हेही आमच्या सोबत येतील. शहराचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देऊ. पण, शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे हे मात्र बैठकीसाठी आलेच पाहिजेत. ते आले नाहीत तर मी महापालिकेत येणार नाही. त्यांच्यावर माझे इतके विशेष प्रेम आहे की त्यांना सोडून मी या शहरात काही करत नाही. जे काही करतो ते त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या सल्ल्याशिवाय करत नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचवून त्यांनाही बैठकीस बोलवा, असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी महापौरांना जणू आदेशच दिला. 

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये महापालिकेत सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीत शेखर इनामदार आणि मकरंद देशपांडे यांचाही समावेश होता. या दोघांनाही जयंत पाटील यांनी महत्त्वाची पदे ही भूषविण्याची संधी दिली होती, त्यामुळे या दोघांवर त्यांचे विशेष प्रेम आहे, हे महापालिकावासियांना माहीत होतेच. आज त्यांनी आपल्या जाहीर भाषणातूनच त्याची प्रचिती दिली. त्यांच्या या वक्तव्याचे आज शहरात चर्चा सुरू होती. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com